Most Expensive Fruit of the World: जगात अनेक प्रकारची फळे आणि भाज्या (Fruits And Vegetables) उपलब्ध आहेत, ज्या मनुष्याच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. भारतातही अनेक प्रकारच्या भाज्या पिकवल्या जातात, ज्यांच्या किंमतीत आपणांस नेहमी बदल पाहायला मिळतो. परंतु, जगातील सर्वात महागड्या फळाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या फळांची किंमत ऐकून तुमच्या भुवया उंचवणार आहेत. या फळाच्या किंमतीत तुम्हाला एखाद्या जमीनीचा तुकडा खरेदी करता येऊ शकतो. विशेष म्हणजे, हे फळ फक्त जपानमध्येच पिकवले जाते. तर, या फळाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. 


हे देखील वाचा- First Diwali After Marriage: लग्नानंतर पहिली दिवाळी साजरी करणाऱ्या जोडप्यांसाठी खास टीप्स


युबरी खरबूज असे या फळाचे नाव आहे. हे जगातील सर्वात महाग फळांपैकी एक आहे. हे फक्त जपानमध्ये पिकवले जाते आणि विक्री केल्यावर त्याची किंमत 20 लाख प्रति किलो पर्यंत मिळते. केवळ श्रीमंत लोकच या फळाची खरेदी करू शकतात. या फळाला कमी प्रमाणात पिकवले जाते. त्यामुळे या फळाची परदेशात निर्यात केली जात नाही. 


हे देखील वाचा- Diwali 2021: प्रवास करताना होतो उल्ट्यांचा त्रास? दिवाळीत फिरायला जाताना घ्या 'ही' काळजी


आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे फळ 20 लाख रुपये प्रतिकिलोने विकले जात असतानाही या फळाला मोठी मागणी आहे. हे ग्रीनहाऊसमध्ये सूर्यप्रकाशाखाली पिकवले जाते. दरम्यान, अनेक फळे आणि भाज्या आहेत, ज्यांची किंमत तब्बल लाखोच्या घरात आहे. हॉप शूट नावाची एक भाजी आहे, जी 80 हजार ते एक लाख रुपये प्रतिकिलो दराने विकली जाते. हॉप शूटच्या भाजीला जगभरात मोठी मागणी आहे. 


हे देखील वाचा-सणासुदीत खव्यामध्ये भेसळीचं प्रमाण वाढलं! कसा ओळखाल भेसळयुक्त खवा? 


जगातील सर्वात महागड्या फळांबद्दलची माहिती ऐकून तुम्ही नक्कीच विचारात पडले असाल. कारण, भारतात सर्वसाधारणपणे  कोणतेही फळ दर किलोला 200-300 रुपयांपेक्षा जास्त दराने विकले जात नाही.