Teachers Day 2024 Wishes In Marathi : शिक्षक दिनाचे (Teachers Day  2024) निमित्त खूप खास आहे. दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी देशभरात शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस देशासाठी विशेष आहे, कारण हा दिवस भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr Sarvapelli Radhakrishnan) यांची जयंती आहे. हा खास दिवस साजरा करण्यासाठी अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या गुरूंना शुभेच्छा देतात. जर तुम्हाला तुमच्या प्रिय गुरूंप्रती तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. तुमच्या शिक्षकांबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्यांना या संदेश, कोट्स आणि एसएमएसच्या मदतीने शुभेच्छा पाठवू शकता. (Teachers Day 2024 Wishes In Marathi)



शिक्षक दिन 2024 शुभेच्छा तुमच्या शिक्षकांना पाठवा..


शि म्हणजे शीलवान
क्ष म्हणजे क्षमाशील
क म्हणजे कर्तव्येनिष्ठ
अशा सर्वच शिक्षकांना वंदन
शिक्षकदिनांचा हार्दिक शुभेच्छा



शिक्षणाच्या ज्योतीतून अज्ञानाचा अंधार दूर करत
नवभारताची सुशिक्षित पिढी घडविणाऱ्या
सर्व शिक्षकांना शत शत नमन!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.



आपण केवळ आमचे शिक्षक नाही
आपण आमचे मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शक आहात
सर्व एका व्यक्तीमध्ये आकार घेतलेले
तुमच्या पाठिंब्याबद्दल नेहमी आभारी राहू
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.



गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान..
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया..
शिक्षक दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा! 



माझे आईवडिल, नातेवाईक, गुरुजन,
बालपण पासून ते आजपर्यंतचा मित्रपरिवार
आणि ज्ञात अज्ञातपणे 
मला काही ना काही शिकवून गेले, 
अश्या सर्व शिक्षकांना वंदन...



आयुष्याला आकार,आधार आणि
अमर्याद ज्ञान देणारे प्रत्येक
गुरुवर्यास शतशः नमन…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!



काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत
हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!



तुमच्यासारखा शिक्षक मिळणं हे
आशिर्वादापेक्षा कमी नाही...
माझं जग बदलण्यासाठी
खूप-खूप धन्यवाद..
शिक्षकदिनांनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा



गुरूने दिला ज्ञानरूपी वसा,
आम्ही चालवु हा पुढे वारसा
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः |
गुरुःसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ||
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !



शिक्षण हेच परिवर्तनाचे माध्यम...
शिक्षण हाच विकासाचा खरा मंत्र..
जीवनात शिक्षकांची भूमिका मोलाची..
शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


 


 


हेही वाचा>>>


Teachers Day 2024 : शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचाय? शिक्षक दिनी 'असं' हृदयस्पर्शी भाषण करा की, श्रोते करतील कौतुक, टाळ्यांचा होईल कडकडाट!


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )