Solar eclipse India 2022 : 30 एप्रिल रोजी म्हणजेच आज वर्षातील पहिले आंशिक सूर्यग्रहण जगातील अनेक भागांमध्ये दिसणार आहे. ही घटना ब्लॅक मून नावाच्या दुसर्या खगोलीय क्रियाकलापाशी देखील टक्कर देत आहे आणि नासाच्या म्हणण्यानुसार, ब्लॅक मून दिवसा काही काळ सूर्यप्रकाश रोखेल. सूर्यग्रहण दक्षिण गोलार्धातील काही भागांमध्ये दिसणार आहे. दक्षिण अमेरिकेतील काही भागात राहणारे लोक, चिली, उरुग्वे, नैऋत्य बोलिव्हिया, पेरू, नैऋत्य ब्राझील आणि अर्जेंटिना या खगोलीय घटनेचे साक्षीदार होऊ शकतील.
नासाने असेही स्पष्ट केले आहे की, हे ग्रहण दक्षिण प्रशांत महासागर आणि दक्षिण महासागर क्षेत्रातून देखील दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारतातील लोक पाहू शकणार नाहीत. आंशिक सूर्यग्रहण भारताच्या वेळेनुसार 30 एप्रिल 2022 रोजी मध्यरात्री 12:15 पासून सुरू होईल आणि पहाटे 4:7 पर्यंत राहील. हे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नका, फक्त दुर्बिणीने किंवा चष्म्याने पहावे.
30 एप्रिल रोजी होणारे आंशिक सूर्यग्रहण ऑनलाइन कसे पहावे ?
ज्या भागात खगोलीय घटना दिसणार नाही, लोक ते ऑनलाइन थेट पाहू शकतात. त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग नासाच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात आंशिक असेल. यामुळे त्याचा कोणताही शारीरिक परिणाम होणार नाही.
चंद्रग्रहण : 16 मे च्या चंद्रग्रहण दरम्यान परिस्थिती वेगळी असेल, कारण ते दिवसा होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार ते सकाळी 07.02 वाजता सुरू होईल आणि संपूर्ण ग्रहण सकाळी 07.57 च्या सुमारास सुरू होईल. जास्तीत जास्त ग्रहण सकाळी 09.41 च्या सुमारास होईल. जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या सर्वात खोल भागात असेल आणि एकूण ग्रहण सकाळी 10.23 वाजता संपेल.
महत्वाच्या बातम्या :
- Surya Grahan 2022 : 30 एप्रिलला होणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण; गर्भवती महिलांनी 'या' गोष्टींची काळजी घ्यावी
- Solar Eclipse 2022 : 'या' दिवशी होणार वर्षातील पहिले सूर्यग्रहण; कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या सविस्तर
- Surya Grahan 2022 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिलमध्ये! 'या' राशींवर होणार सर्वाधिक परिणाम, जाणून घ्या