Indian Railway : मुलांच्या वार्षिक परीक्षा आणि एकदा का मार्च संपला की बहुतेक कुटुंब बाहेर फिरायला जायचा प्लॅन करतात, पण हा प्लॅन तुमच्या बजेटमध्ये आहे की नाही? हे सुद्धा तितकंच आवर्जून पाहिलं जातं, पण आता चिंता करू नका, तुमची स्वस्तात फिरायची इच्छा पूर्ण होणार आहे, कारण तुम्हाला भारतीय रेल्वेचे सर्वात स्वस्त टूर पॅकेजबद्दल माहित आहे का? नसेल माहित तर आम्ही तुम्हाला याबद्दल अधिक माहिती देणार आहोत. 


मार्च आणि एप्रिल अनेक टूर पॅकेजेस


भारतीय रेल्वेने मार्च आणि एप्रिल महिन्यात भेट देण्यासाठी अनेक टूर पॅकेजेस आणली आहेत. जर तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या पॅकेजेसचा विचार जरूर करावा. कारण भारतीय रेल्वे पॅकेजमध्ये तुमचे जेवण आणि हॉटेलची सुविधाही पुरवते. यामध्ये तुम्हाला फक्त टूर पॅकेज बुक करावे लागेल. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला अशाच काही पॅकेजेसबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही 6 ते 7 दिवसांची टूर प्लॅन करू शकता.


मध्य प्रदेश ज्योतिर्लिंग टूर पॅकेज


हे पॅकेज 19 मार्चपासून हैदराबाद येथून सुरू होणार आहे. 19 मार्चनंतर, तुम्ही दर बुधवारी या पॅकेजसाठी तिकीट बुक करू शकता.
हे 5 रात्री आणि 6 दिवसांचे टूर पॅकेज आहे.
याद्वारे तुम्हाला भोपाळ, ओंकारेश्वर, सांची आणि उज्जैनला भेट देण्याची संधी मिळेल.
या पॅकेजमध्ये तुम्ही ट्रेनमधून प्रवास करू शकाल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास, तुम्हाला प्रति व्यक्ती 18850 रुपये द्यावे लागतील.
तीन लोकांसोबत प्रवास केल्यास प्रति व्यक्ती 16,020 रुपये मोजावे लागतील.


गुवाहाटी टूर पॅकेज


हे पॅकेज 11 एप्रिलपासून चंदीगड येथून सुरू होत आहे. 
हे 6 रात्री आणि 7 दिवसांचे टूर पॅकेज आहे, ज्यामध्ये तुम्हाला चेरापुंजी, गुवाहाटी, काझीरंगा, मावलिनॉन्ग आणि शिलाँग येथे नेले जाईल.
पॅकेजमध्ये तुम्हाला फ्लाइटने प्रवास करण्याची संधी मिळेल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास, तुम्हाला प्रति व्यक्ती 46700 रुपये द्यावे लागतील.
लक्षात ठेवा की पॅकेजमध्ये तुमची 6 दिवसांची राहण्याची व्यवस्था, भोजन, प्रेक्षणीय स्थळे आणि फ्लाइटचा खर्च समाविष्ट आहे.
तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 44800 रुपये आहे.


अहमदाबाद-द्वारका टूर पॅकेज


हे पॅकेज 20 मार्चपासून हैदराबाद, कल्याण, पुणे, सिकंदराबाद आणि सोलापूरमध्ये सुरू होणार आहे.
20 मार्चनंतर तुम्ही दर बुधवारी या स्थानकांवरून ट्रेन घेऊ शकता.
या पॅकेजद्वारे तुम्हाला 7 रात्री आणि 8 दिवस प्रवास करण्याची संधी मिळेल.
पॅकेजमध्ये तुम्हाला अहमदाबाद, द्वारका, राजकोट, सोमनाथ आणि वडोदरा येथे नेले जाईल.
पॅकेज फी - दोन लोकांसोबत प्रवास करत असल्यास, तुम्हाला प्रति व्यक्ती 28280 रुपये द्यावे लागतील.
तीन लोकांसोबत प्रवास केल्यास प्रति व्यक्ती 27,610 रुपये मोजावे लागतील.


 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Love Marriage : 'प्रेमविवाह करायचाय हो, पण पालकांची संमती..?' 'या' भन्नाट ट्रिक फॉलो करा, तुमचं काम झालंच म्हणून समजा!