Summer Health Care Tips : देशभरात उन्हाचे चटके बसू लागले आहेत. राज्यात देखील काही ठिकाणी विक्रमी तापमानाच्या नोंदी होत आहेत. उन्हाच्या प्रचंड तडाख्यानं लोकांचे हाल होत आहेत. उन्हाळ्यामध्ये प्रकृतीकडे लक्ष देणं विशेष गरजेचं असतं. उन्हाळा येताच ऊन आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. कोणी आपल्या आरोग्यावर लक्षं देतं, तर कोणी आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय करतं. कारण वाढत्या उष्णतेमुळे त्वचेपासून ते शरीराच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
आज आम्ही तुम्हाला उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काही घरगुती उपाय सागंणार आहोत.
उन्हाळ्यात आरोग्य राखण्यासाठी घरगुती उपाय :
जास्त प्रमाणात पाणी प्या
उन्हाळ्यात शरीराला जास्त पाणी पिण्याची गरज असते. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. त्वचा तजेलदार राहण्यासोबतच आरोग्य राखण्यासही मदत होते. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यात अशक्तपणा जाणवत नाही.
लिंबू सरबत ठरतं फायदेशीर
उन्हाळ्यात लोक लिंबू सरबताचं सेवन करणं पसंत करतात. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळण्यासोबतच आरोग्यही उत्तम राखण्यास मदत होते. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरताही पूर्ण होते. तसेच शरीराला उर्जा देण्यासही मदत करते.
कैरीचं पन्हं
फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याचं आगमन उन्हाळ्यात होतं. अशातच उन्हाळ्यात कैरीचं पन्हं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. कैरी, काळं मीठ आणि मिरची यांच्या मदतीने तयार केलं जाणारं कैरीचं पन्हं अनेकजणांना आवडतं. शरीराला उर्जा मिळवण्यासाठी कैरीचं पन्हं अत्यंत फायदेशीर ठरतं.
सुती कपडे परिधान करा
उन्हाळ्यात सुती कपडे परिधान करणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. त्वचेसाठी सुती कपडे उत्तम ठरतात. उन्हाळ्यात सतत येणारा घाम सुती कपड्यांमुळे लवकर सुकण्यास मदत होते.
त्वचेला उष्णतेपासून बचाव करण्यासाठी उपाय :
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. अनेकदा उन्हाळ्या त्वचेचा रंगं काळवंडणे किंवा अॅलर्जी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. चेहऱ्याच्या त्वचेला थंडावा देण्यासाठी काकडीचा रसं अत्यंत फायदेशीर ठरतो. तसेच काळवंडलेल्या त्वचेचा रंग उजळवण्यासाठीही काकडीचा रंस अत्यंत फायदेशीर ठरतो.
उन्हातून आल्यानंतर काही तासांनी चेहऱ्यावर मुलतानी माती आणि चंदनाची पावडर लावा. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. याचसोबत चंदन, तुळस आणि गुलाब यांसारख्या नैसर्गिक गोष्टीही चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरतात.
गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात भिजवून त्या पाण्याने चेहरा धुतल्याने उन्हाळ्यात त्वचा मुलायम होण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :