Sugar Craving : अनेकदा रात्री जेवल्यानंतर, आपल्याला काहीतरी गोड खावंसं वाटतं. अशा वेळी आपण आईस्क्रीम, मिठाई, चॉकलेट्स असे गोड पदार्थ खातो आणि ही पद्धत अनेक लोक पाळतात. मिठाई (Sweets) खाल्ल्याने आपला मूड सुधारतो आणि आपल्याला समाधानही वाटते. म्हणूनच अनेक लोक जेवणानंतर गोड खाणं आरोग्यदायी मानतात. मात्र, कधीतरी रात्रीच्या जेवणानंतर मिठाई खाण्यात काही नुकसान नसते. पण, जर ही तुमची रोजची सवय असेल तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. पण मिठाई खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला काय नुकसान होऊ शकते? दररोज मिठाई खाण्याची सवय तुमच्यासाठी हानिकारक का असू शकते? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
खरंतर, रात्रीच्या जेवणानंतर गोड खाल्ल्याने तुमची रक्तातील साखरेची पातळी खराब होऊ शकते. यामुळे, तुमच्या चयापचयापासून ते तुमच्या झोपेच्या वेळेपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. या सवयीमुळे मधुमेह आणि हृदयविकारांसह अनेक धोकादायक आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे रोज रात्री जेवणानंतर गोड खाणे हानिकारक ठरू शकते.
मधुमेहाचा धोका
रात्रीच्या जेवणानंतर नियमितपणे गोड खाल्ल्याने इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढू शकते. यामुळे तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहत नाही आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
हृदयरोगाचा धोका
मिठाई खाल्ल्याने तुमच्या शरीरातील ट्रायग्लिसराईडची पातळी वाढू शकते, जी तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. खरंतर, ट्रायग्लिसराइड हा एक प्रकारचा फॅट आहे, जो आपल्या रक्तात आढळतो. त्याचे प्रमाण वाढल्यामुळे, तुमच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
झोपेच्या वेळा बदलणे
मिठाई खाल्ल्याने तुमच्या शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. यामुळे तुमचा मेंदू खूप सक्रिय होतो, ज्यामुळे तुमच्या झोपेच्या वेळा बदलू शकतात. तसेच, गाढ झोप न मिळाल्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स जास्त प्रमाणात बाहेर पडतात. हे नंतर अनेक रोगांचे कारण बनू शकते.
वृद्धत्व प्रक्रिया लवकर वाढते
साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे तुमच्या शरीरात ऑक्सिडेटिव्ह ताण आणि जळजळ होण्याचा धोका वाढतो. हे दोन्ही घटक अकाली वृद्धत्वास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे फाईन लाईन्स, हार्मोनल असंतुलन यांसारखे नुकसान होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.