नोकरीसाठी मुलाखतीला जाण्याआधी हे प्रश्न नक्की पाहून जा!
एबीपी माझा वेब टीम | 05 Apr 2016 10:46 AM (IST)
मुंबई: जर आपण नोकरीच्या शोधात असाल आणि मुलाखतीची तयार करीत असाल तर काही गोष्टी नक्की जाणून घ्या. कारण की तुम्हाला नोकरी मिळविण्यासाठी विचित्र प्रश्नांना सामोरं जावं लागू शकतं. काही मोठ्या कंपन्यांच्या मुलाखतीमध्ये तुम्हाला विचित्र प्रश्न विचारले जाऊ शकतात. तसे प्रश्न विचारले गेल्यास त्याची उत्तर देण्यास तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. जाणून घ्या असे कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात: 1. जर तुम्हाला १ कोटी रुपये दिले आणि 24 तासात हेच पैसे दुप्पट करायला सांगितले तर तुम्ही ते कसे कराल? 2. एका खोलीत किती बास्केटबॉल राहू शकतात. 3. जर तुम्हाला 100 कोटी बिजनेस सुरु करण्यासाठी दिले तर आपण कोणता बिझनेस सुरु कराल. 4. हॉट केक विक्री विकण्यासाठी तुम्ही कोणता फंडा वापराल. 5. तुम्ही तुमच्या पहिल्या अल्बमचं का नाव ठेवाल. 6. समजा तुम्ही जर एखाद्या कंपनीचे सीईओ आहात. तर सकाळी उठल्यानंतर तुमच्या कंपनी बद्दल कोणती गोष्ट पाहाल.