मुंबई: आपल्याला आवडणाऱ्या एखाद्या तरुणीला इम्प्रेस करणं तसं अवघडच काम.. ज्यावेळेस तुम्ही स्मार्ट आणि हँण्डसम दिसत नाही. त्यावेळेस तर जरा जास्तच... पण असं जरुरी नाही की फक्त तुमच्या दिसण्यामुळेच तुम्ही एखाद्या तरुणीला आवडू शकता.

 

एखाद्या तरुणीच्या मनात भरणं हि देखील एक कला आहे. फक्त चांगले कपडे परिधान करुन किंवा स्टाइल मारुन तुम्ही तरुणीच्या मनात भरु शकत नाही. अशावेळी जर तुम्हाला तरुणीच्या मनात जागा बनवायची असल्यास आधी तिला जाणून घ्या. जाणून घ्या यासाठी काय आहेत नेमक्य टिप्स

 

एखाद्या तरुणीला तुम्ही पहिल्यांदाच भेटत असल्यास तो क्षण कसा अविस्मरणीय होईल याचा विचार करा. एखाद्या वॉटरपार्क किंवा लाँग ड्राईव्ह यासारख्या गोष्टींचा वापर करा. जेणेकरुन तरुणी तुमच्यावर नक्कीच इम्प्रेस होईल.

 

तरुणीशी बोला, तुम्ही तिच्यासाठी किती परफेक्ट आहात हे तिला जाणवू द्या. बोलताना कायम तरुणीच्या डोळ्यात डोळे घालून बोला.

 

जर आपण तिला एखाद्या पार्टीमध्ये भेटत असल्यास तिला गर्दीपासून थोडं दूर न्या. तिच्या आवडीनिवडी काय आहेत याकडे लक्ष द्या. एकत्र चालत चालत गप्पा मारा.

 

करामती मुलं बऱ्याचदा तरुणींच्या मनात घर करतात. तुमच्यातील एखादा खास गुण तरुणीला नक्कीच आकर्षित करु शकतो.

 

एखाद्या आवडीविषयी तिची उत्सुकता चाळवा. उदा. जर तिला सिनेमा पाहण्याची आवड असेल तर तुम्ही देखील सिनेमांबाबत नक्की चर्चा करा.

 

गार्डनमध्ये जोडीनं फिरायला जा. त्यावेळेस चालताना हळूच तुमच्या हाताच स्पर्श तिच्या हाताला होऊ द्या. पण तिच्या तेवढच जवळ ज्या जितकं सोईस्कर आहे.

 

तिला काय आवडतं काय नाही आवडत हे जाणून घ्या. त्यानंतरच पुढं बोलणं सुरु ठेवा. तिची थोडी स्तुती करणं चालू ठेवा.

 

पहिल्याच मुलाखतीत तिला एकटक पाहू नका. तिच्या डोळ्यात डोळे टाकून बोला. तिच्याशी कसं बोलता हे देखील फार महत्त्वाचं आहे.

 

तुम्ही एखादं आव्हान कसं स्वीकारता हे देखील तरुणींना आवडतं. त्यामुळे आव्हानं स्वीकारणं सोडू नका.