Strange Traditions: एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (Funeral) केले जातात. अंत्यसंस्कार केल्यानं मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती (Peace To The Soul) मिळते, मोक्ष मिळतो, असं हिंदू धर्मात मानलं जातं. संपूर्ण जगभरात वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अंत्यसंस्काराचे विधीही धर्म आणि जातीनुसार वेगवेगळे आहेत. पण, असे काही समुदाय आहेत, त्यांच्यात अंत्यसंस्कार करण्याची प्रथा फारच वेगळी आहे. तर काही समुदायांची अंत्यसंस्कार करण्याची प्रथा फारच अघोरी आहे. अशीच एक विचित्र प्रथा जगातील एका समुदायाकडून पाळली जाते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर, इथे त्या व्यक्तीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता, शरीराचे अवयव कापून खाल्ले जातात. जाणून घेऊयात... या अघोरी प्रथेबाबात...
अंत्यसंस्कार न करता, मृत व्यक्तीचं शरीरा कापून खाल्लं जातं...
आपल्या जवळच्या, प्रिय व्यक्तीचं जग सोडून जाणं म्हणजे, आपल्या आयुष्यातील अतिशय वेदनादायी आणि दुःखद प्रसंग असतो. अशा परिस्थितीत त्यांच्या मृत्यूनंतर प्रथा-परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले जातात. अंत्यसंस्कार करुन मृतांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याची पद्धत धर्म आणि जातींनुसार वेगवेगळी असते. एवढंच नाहीतर जगभराती वेगवेगळ्या देशांमध्येही वेगवेगळ्या पद्धतींनी अंत्यसंस्कार केले जातात.
काही ठिकाणी अंत्यसंस्काराच्या पद्धती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अशा स्थितीत तुम्हाला माहीत आहे का, की अशी एक जागा आहे, जिथे लोक अंत्यसंस्कार करताना एखाद्या व्यक्तीचा मृतदेह कापून खातात. होय, खरंच एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या देशातील लोक त्या व्यक्तीचा मृतदेह कापून खातात. दरम्यान, ही इंडो-युरोपियन भागात अवलंबलेली 8 वर्ष जुनी प्रथा आहे. या परंपरेत मृत्यूनंतर लोक मृतदेह कापून खातात.
आधी मृतदेह कुजवतात, त्यानंतर...
जगभरात असे काही देश आहेत, जिथे अंत्यसंस्काराची पद्धत फार वेगळी आहे. या देशांमध्ये आधी मृतदेह कुजवतात, त्यानंतर तो मृतदेह कापून खातात. येथील लोक एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर तो मृतदेह तसाच ठेवतात. त्या मृतदेहातील द्रव्य पदार्थ बाहेर येईपर्यंत तो कुजवला जातो. त्यानंतर हे तो मृतदेह कापून खातात. ऐकून धक्का बसला ना... खरंच मृतदेह कुजल्यानंतर येथील लोक तो कापून खातात. अगदी विचित्र वाटणारी ही परंपरा आजही पाळली जाते. काही इतिहासकारांचं म्हणणे आहे की, या पदार्थांपासून वाईन बनवता यावी आणि प्रियजनांच्या स्मरणार्थ ती प्यावी म्हणून ही परंपरा पाळली जाते.
आपल्याला विचित्र वाटणारी ही प्रथा विशेषतः इंडो-युरोपियन भागातील ग्रामीण आणि आदिवासी समुदायांमध्ये प्रचलित आहे. तत्सम प्रथा जगाच्या इतर भागातही पाहावयास मिळतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून मृतदेह खाण्याची प्रक्रिया आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून चांगली मानली जात नाही. काही संशोधनांमधून असं समोर आलंय की, ही प्रथा पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून चांगली असू शकते, कारण ती नैसर्गिक चक्राचा भाग आहे.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत, यातून ABP माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :