Funeral Rituals: या पृथ्वीवर जो जन्माला येतो, तो कधीना कधी जातोच... असं आपण थोरामोठ्यांच्या तोंडून नेहमीच ऐकतो. आपल्या जवळच्या, प्रिय व्यक्तीला गमावण्याचं दुःख कोणीच शब्दात व्यक्त करू शकत नाही. आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो. पण, जन्म-मृत्यू माणसाच्या हातात नाही, हेच अंतिम सत्य आहे. असं म्हटलं जातं की, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्यावेळी त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळण्यासाठी त्याच्यावर योग्य पद्धतीनं अंत्यसंस्कार (Funeral) होणं आवश्यक असतं. जगभरात विविध धर्माचे लोक राहतात. या सर्वांच्या जन्मापासून (Birth) ते मृत्यूपर्यंतच्या (Death) सर्व विधी, सोपस्कार वेगवेगळे असतात. हिंदू धर्मात (Hindu Funeral Rituals) मृत व्यक्तीच्या पार्थीव शरीराला मुखाग्नी (Mukhagni) दिला जातो. पण, तुम्हाला माहितीय का? मुखाग्नी दिल्यानंतर (Funeral Rituals) पार्थिव पूर्णतः जळून खाक होतं, फक्त अस्थी शिल्लक राहतात. पण आपल्या शरीराचा एक असा अवयव आहे, जो मुखाग्नी दिल्यानंतरही जळत नाही. 


हिंदू धर्मातील अंत्यसंस्काराचे विधी आणि सोपस्कार... 


हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का की, अंत्यसंस्कार करताना मृतदेहाला ज्यावेळी मुखाग्नी दिला जातो, त्यावेळी काही मिनिटांतच पार्थिव अनंतात विलिन होतं आणि फक्त अस्थी शिल्लक राहतात. मुखाग्नी दिल्यानंतर पार्थिव शरीराच्या हाडांचीही राख होते.  मृताच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पार्थिव अनंतात विलिन झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अस्थी एका मातीच्या भांड्यात जमा करून नद्यांमध्ये विसर्जित केल्या जातात. 


पण, त्यावेळी पार्थिवाचा एक अवयव मात्र जळत नाही. तो तसाच असतो. शरीराच्या या अवयवाला कधी आग लागत नाही, हे आम्ही सांगत नाहीतर हे संशोधनातून सिद्ध झालं आहे. संशोधनानुसार, पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतर 670 ते 810 अंश सेल्सिअस तापमानात अवघ्या 10 मिनिटांत शरीर नष्ट होऊ लागतं. पुढे 20 मिनिटांनी मतदेहावरची त्वचा जाळीदार दिसू लागते. त्यानंतर 30 मिनिटांनी संपूर्ण त्वचा जळते आणि शरीराचे काही भाग दिसू लागतात. मुखाग्नी दिल्यानंतर 40 मिनिटांनी आतले अवयव आगीत संकुचित होऊन जळू लागतात. त्यानंतर 50 मिनिटांनी हाद-पाय संपूर्ण नष्ट होतात. पुढे एक ते दीड तासानं केवळ हाडांचा सापळा शिल्लक राहतो. मानवी शरीर संपूर्ण जळून जाण्यासाठी साधारणतः दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो, असं संशोधनातून समोर आलं आहे. पण, दोन-तीन तासांनंतरही शरीराचा एक भाग अजिबात जळत नाही. 


मृत्यूनंतर शरीराचा कोणता अवयव जळत नाही? 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे की, माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला जातो. त्यावेळी संपूर्ण शरीर जळून राख होतं, पण माणसाचे दात मात्र जळत नाहीत. पार्थिव जळाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अस्थिंमध्ये तुम्ही दात अगदी सहज ओळखू शकतात. यामागील कारण म्हणजे, माणसाचे दात कॅल्शियम फॉस्फेटपासून तयार होतात. त्यामुळे दातांवर आगीचा काहीच परिणाम होत नाही. म्हणूनच पार्थिव संपूर्ण जळून खाक झाल्यानंतरही दाद मात्र तसेच राहतात. 


(टीप : वरील सर्व गोष्टी संशोधनाच्या आधारावर आणि वैज्ञानिक तथ्यांवर केवळ माहिती म्हणून देण्यात आल्या आहेत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.) 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


प्रेताला अग्नी देऊन स्मशानातून घरी परतल्यावर आंघोळ का करायची? जाणून घ्या, 'ही' 5 कारणं