Soha Ali Khan Weight Loss: बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान (Soha Ali Khan) आपल्या फिटनेस आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखली जाते. 47 वर्षांची असूनदेखील तिचं तेज आणि तंदुरुस्ती पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं अवघड आहे. काही महिन्यांपूर्वी तिने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमधून एक अनोखी आरोग्य सवय उघड केली ती रोज सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण चावून खाते! सोहाने पोस्टमध्ये लिहिलं, “गेल्या चार आठवड्यांपासून मी माझ्या दिवसाची सुरुवात एकाट्या लसणाच्या पाकळीसोबत करतेय. हा छोटासा उपाय रोगप्रतिकारक शक्ती, पचनसंस्था, सूज आणि एकूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. जुना असला तरी हा नुस्खा अजूनही तितकाच प्रभावी आहे.”(Garlic health Benefits)
लसणाची एक पाकळी रिकाम्या पोटी चावून खाते
ती पुढे सांगते, “मी लसणाची एक पाकळी रिकाम्या पोटी चावून खाते आणि शक्य तितका वेळ चावते, जेणेकरून त्यातला ‘अॅलिसिन’ हा घटक सक्रिय होतो. नंतर मी ते पाण्याबरोबर गिळते. जर तुम्हाला चावता येत नसेल तर ती पाकळी ठेचून 10 मिनिटे ठेवली तरी चालते.” सोहाने या पोस्टमध्ये एक महत्त्वाची सूचना देखील दिली आहे .“हे सगळ्यांसाठी नाही. जर तुम्ही रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा वापर करत असाल, तुमचं पोट संवेदी असेल किंवा लवकरच शस्त्रक्रिया करायची असेल, तर लसूण खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.” लसूण खाल्ल्यानंतर येणाऱ्या दुर्गंधीबाबतही तिने उपाय सांगितला “हो, लसणाचा वास खरा आहे, पण त्याचे फायदेही तेवढेच खरे आहेत! त्यामुळे जेवल्यानंतर चांगल्या प्रकारे दात घासा आणि माउथवॉश वापरा.”
लसूण आरोग्यासाठी का फायदेशीर आहे?
1. अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण शरीरातील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यात मदत करतात.
2. अँटी-मायक्रोबियल प्रभाव: बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगसविरुद्ध लढण्यास सहाय्यक.
3. त्वचेसाठी फायदेशीर :अँटी-बॅक्टेरियल गुणामुळे मुरुम निर्माण करणारे जंतू नष्ट होतात आणि त्वचा स्वच्छ राहते.
4. पचनसंस्थेसाठी उपयुक्त: चांगले बॅक्टेरिया वाढवतो आणि वाईट बॅक्टेरिया कमी करतो.
5. रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो : ‘अॅलिसिन’ घटक शरीराची इम्युनिटी मजबूत करून वारंवार होणारे आजार टाळतो.