Mumbai children hostage : मुंबईतील पवईमध्ये एका व्यक्तीने काही मुलांनी ओलीस ठेवल्याची घटना घडली आहे. रोहित आर्य असं मुलांना ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ओलीस ठेवलेली मुले ही 15 वर्षाखालील आहेत. साधारण 20 ते 22 मुले ओलीस ठेवली आहेत. मुलांना डांबून ठेवण्याऱ्या रोहित आर्याने आग लावून देण्याची धमकी देखील दिली आहे. रोहित आर्य ने एक व्हिडीओ देखील जारी केली आहे. यामध्ये नेमकी काय धमकी दिली आहे त्याबाबतची माहिती पाहुयात. 

Continues below advertisement

व्हिडीओमध्ये नेमकं काय काय म्हणाला रोहित आर्य?

रोहित आर्य हा मानसिक रुग्ण असल्याची देखील माहिती मिळत आहे. या व्यक्तीने मुलांना नेमकं का डांबून ठेवलं याबाबतची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. पवईतील रा स्टुडीओमध्ये ही घटना घडली आहे. मुलांना या ठिकाणी ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते. आत्महत्या करण्याऐवजीमी एक प्लॅन बनवला होता. माझ्या काही मोठ्या मागण्या नाहीत. माझ्या छोट्या मागण्या आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची मला उत्तरे हवी आहे. यापलीकड़े मला काहीच नको आहे. मी दहशतवादी नाही. माझी कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी नाही. मला संवाद साधायचा आहे. ज्यामुळं मी या मुलांना ओलीस ठेवलं आहे. मी प्लॅन करुनच या मुलांना ओलीस ठेवलं आहे. मी हे करणारच होतो. मी जिवतं राहिलो तर करेल नाहीतर मरेल अशी माहिती रोहत आर्य या व्यक्तीने व्हिडीओ बनवून दिली आहे. या ठिकाणी आग लावून देण्याची धमकी देखील त्याने दिली आहे. माझं बोलणं झाल्यानंतर मी स्वत: बाहेर येणार आहे. मी एकटा नाही तर माझ्या बरोबर खूप सारे लोक आहेत. अनेकांना खूप अडचणी आहेत. अनेकांना अनेक वेळा भेटून झाले. दिनांक 1 मे पासून साधे उपोषण करून देखील अजून आज, उद्या असेच होत आहे. आजापासून तीव्र उपोषण सुरु केले. आता पाणी सुद्धा घेणार नाही. गांभीर्य समजून घेतले तर बरे होईल, नाही समजले तर जय श्री राम असं  रोहित आर्यने (Rohit Arya)  म्हटलं आहे. 

मुलांना ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घेतलं ताब्यात 

पवईच्या रा स्टुडीओमध्ये मुलांना ओलिस ठेवण्यात आलं आहे. मुलांना ताब्यात घेणाऱ्या व्यक्तीला पोलीस आणि अग्निशामक दलाच्या मदतीने ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. डांबून ठेवलेल्या मुलांची सुखरुप सुटका देखील करण्यात आली आहे.  

Continues below advertisement

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी : मुंबईत तब्बल 20-22 मुलांना ओलीस ठेवलं; रोहित आर्यचं कृत्य, व्हिडीओ बनवून मोठ्या मागण्या