कोंबडीजवळ झोपल्याने मलेरियापासून बचाव
त्यामुळे मलेरियाचे डासदेखील काही विशिष्ट प्राण्यांपासून दूर पळतात हे या संशोधनाने समोर आले आहे.
या शोधादरम्यान मलेरियाचे डास कोंबड्याच्या वासाने दूर पळतात हे जाणून आम्हालाही धक्का बसल्याचे, स्वीडिश युनव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर सायन्सचे विशेषज्ञ प्राध्यापक रिसचर्ड इन्गल यांनी सांगितले.
स्वीडन आणि इथोपियामधील विशेषज्ञांनी जवळपास १२०० जणांवर हे संशोधन केले. यावेळी फक्त एकाच व्यक्तीला डासांऐवजी कोंबडीने चावल्याचे आढळून आले.
इथोपियामध्ये करण्यात आलेल्या या संशोधनामध्ये मलेरियाच्या डासांना माणसाच्या रक्ताचे आकर्षण असते, पण कोंबड्यांच्या विचित्र वासामुळे हे डास दूर पळतात.
टीओआयमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, कोंबडीजवळ झोपल्याने मलेरिया होत नसल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
कोंबडीजवळ झोपल्याने मलेरियापासून बचाव होऊ शकतो, हे वाचून तुम्हाला विनोद वाटेल, पण हे एका संशोधनातून समोर आले आहे.