रजनीकांतच्या 'कबाली' सिनेमाबाबत 10 गोष्टी
या सिनेमात रजनीनं टिपिकल इमेज दाखवण्यात आलं नाही. या सिनेमात रजनीकांतचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक मे रोजी या सिनेमाचं टीजर आणि ऑडिओ रिलीज केल्यानंतर प्रेक्षकांना याच्या ट्रेलरबाबत बरीच उत्सुकता होती. पण शेवटपर्यंत याचा काहीही ट्रेलर आला नाही.
कबाली मलेशियात प्रदर्शित होणारा पहिला भारतीय सिनेमा आहे. कबाली सिनेमाचं जास्तीत जास्त शुटींग हे मलेशियात झाल्यानं हा सिनेमा तिथेही प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. यासोबतच हा सिनेमा चायनीज आणि जापनीज भाषेतही प्रदर्शित होणार आहे.
सिनेमा सुरु झाल्यानंतर तब्बल 15 मिनिटांनी रजनीकांत पाहायला मिळतो. 1991 साली 'तलपति' यांच्या सिनेमातही अशीच लेट एंट्री होती.
कबाली एका रिअल लाइफ डॉनची कहाणी आहे. कबालीच्या शुटींगपासूनच ही कहाणी कोणाची आहे? याबाबत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. हा सिनेमा चेन्नईतील मयलापोर याच्या रिअल लाइफ गँगस्टर कबालिश्वरम यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे.
कबाली हा एक वेगळा सिनेमा असू शकतो. कबालीचा दिग्दर्शक पी. रंजीत हे रजनीकांत आणि त्यांच्या मुलीला दोन वेगवेगळ्या स्क्रिप्ट घेऊन भेटले होते. त्यातील एक गँगस्टरची होती तर दुसरी साय-फाय सुपरनॅच्यरल. पण रजनीकांतनं गँगस्टरवाल्या स्क्रिप्टची निवड केली.
रजनीकांतनं 20 वर्षानंतर नव्या टीमसोबत काम केलं. आजवर रजनीकांतनं नामांकित दिग्दर्शक, सिनेमेटोग्राफर, अभिनेत्यांसोबत काम केलं आहे. पण यावेळेस त्यानं एका नव्या टीमसोबत काम केलं आहे.
कबाली हा रजनीकांतचा एकमेव सिनेमा आहे ज्यामध्ये एसपी बालासुब्रमण्यम यांनी गाणं गायलेलं नाही. 1992 मध्ये पांडियन सिनेमानंतर बालासुब्रमण्यम यांनी रजनीकांतच्या प्रत्येक सिनेमात गाणं गायलं आहे. पण या कबालीत बालासुब्रमण्यम यांनी एकही गाणं गायलेलं नाही.
सुपरस्टार रजनीकांतचा सिनेमा 'कबाली' आज प्रदर्शित झाला. या सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी चाहत्यांच्या मनावर गारुड घातलं होतं. जर तुम्हीही हा सिनेमा पाहायला जाणार असाल तर या 10 गोष्टी नक्की वाचा
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -