Skin Care Tips : प्रत्येकालाच आपली त्वचा नितळ, सुंदर आणि तजेलदार (Skin Care Tips) हवी असते. यासाठी आपल्या त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. काही लोक स्किन केअर रूटीन फॉलो करण्यापासून ते फेसवॉश करण्यापर्यंत आपल्या स्किनची काळजी घेतात. पण स्किन रूटीन फॉलो करताना कळत नकळतपणे अनेक चुका वारंवार होतात. या चुकांमध्ये आपण सर्वात महत्त्वाची चूक करतो ती म्हणजे आपला स्किव टोन ओळखणं. जर तुम्ही तुमच्या त्वचेचा स्किन टोनच ओळखला नाही तर तुमच्या त्वचेवर मेकअपचा कोणताही फरक पडणार नाही. तेलकट, कोरडी, कॉम्बिनेशन असे त्वचेचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये तेलकट त्वचा (Oily Skin) असणाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पण ऑईली स्किन म्हणजे नेमकं काय? तसेच, स्किन केअर रूटीन फॉलो करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
तेलकट त्वचेवर काहीही लावताना चूक झाली तर पिंपल्स येतात. या कारणास्तव लोक मॉइश्चरायझर लावणं टाळतात. या ठिकाणी तेलकट त्वचा असणाऱ्या लोकांनी मॉइश्चरायझर कधी लावावं? हे सांगणार आहोत.
तेलकट त्वचा म्हणजे काय?
आयुर्वेदात असं म्हटलंय की, कफ दोषामुळे त्वचा तेलकट होते. आपल्या आत सेबम तयार होतो आणि जर ते जास्त प्रमाणात वाढू लागले तर ते छिद्रांद्वारे चेहऱ्यावर येऊ लागते. सामान्य भाषेत याला त्वचेवर असलेले नैसर्गिक तेल म्हणतात. त्वचेवर तेल, घाण किंवा धूळ साचली तर छिद्रे घट्ट होऊ लागतात. बदलत्या हवामानामुळे किंवा अनुवांशिक कारणांमुळे त्वचा तेलकट असू शकते. मात्र, असं सतत होत राहिल्यास पिंपल्सची समस्या उद्भवते.
त्वचेवर मॉइश्चरायझरचा वापर
सर्वात आधी, त्वचेवर मॉइश्चरायझर लावणं का महत्त्वाचे आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. त्वचेत ओलावा नसल्यामुळे पिंपल्स, कोरडेपणा (Dryness) किंवा इतर समस्या उद्भवू लागतात. मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो. अनेक तज्त्रांच्या म्हणण्यानुसार, तुमचा स्किन टोन कोणताही असला तरी मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे.
तेलकट त्वचेसाठी मॉइश्चरायझर का आवश्यक आहे?
अनेक लोकांमध्ये असा गैरसमज आहे की, तेलकट त्वचेवर मॉइश्चरायझर लावल्याने त्वचा जास्त तेलकट होते. ती अधिक तेलकट दिसते. तर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही मॉइश्चरायझर लावले नाही तर त्वचेला हायड्रेशनसाठी जास्त तेल तयार होते. त्वचा स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी हे तेल तयार करते.
त्वचेवर मॉइश्चरायझर कधी लावावे?
तेलकट त्वचा असणाऱ्यांनी रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवर मॉइश्चरायझर लावावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावण्याआधी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. आणि नंतर मॉइश्चरायझर लावा. असे केल्याने त्वचा हायड्रेट राहते. तसेच, मॉइश्चरायझर निवडताना तुमचा स्किन टोन लक्षात ठेवा आणि चांगल्या प्रतीचा मॉइश्चरायझर लावा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :