Skin Care Tips : सध्याच्या धावपळीची आणि धकाधकीच्या जीवनात शरीराकडे दुर्लक्ष तर होतंच. पण, त्याचबरोबर त्वचेवरही आपण फारसं लक्ष देत नाही. घर असो किंवा ऑफिस चेहरा (Face) निरोगी असणं फार महत्त्वाचं आहे. यासाठीच महिलांनी वेळोवेळी पार्लरला जाणे गरजेचे आहे. जेणेकरून तुमच्या त्वचेतील सगळी वाईट स्किन निघून तुमची त्वचा (Skin) अगदी नितळ राहील. मात्र, असे जरी असले तरी प्रत्येकाला पार्लरमध्ये जाऊन महागडे प्रोडक्ट्स खरेदी करणं शक्य होत नाही. अशा वेळी तुम्ही कोणतीही चिंता न करता अगदी घरजुती उपायांनी देखील तुमची त्वचा निरोगी आणि तजेलदार ठेवू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला त्वचेशी संबंधित काही घरगुती गोष्टींपासून स्क्रबिंग कसे करावे हे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात स्क्रबिंग म्हणजे काय आणि घरच्या घरी कोणत्या गोष्टींपासून चेहऱ्यासाठी चांगला स्क्रब बनवता येतो. 


स्क्रबिंग म्हणजे काय? 


त्वचेला एक्सफोलिएट करणे याला स्क्रबिंग म्हणतात. स्क्रबमुळे त्वचेला अनेक फायदे होतात. खरंतर, आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर मृत त्वचेच्या पेशी जमा होतात, त्या काढण्यासाठी स्क्रब केला जातो. जर स्क्रब केले नाही तर ही मृत त्वचा चेहऱ्यावर डागांसारखी दिसू लागते, चेहऱ्याचा रंग उडालेला दिसतो आणि त्वचा कोणतेही प्रोडक्ट नीट शोषून घेऊ शकत नाही. या सर्व कारणांमुळे त्वचेवर स्क्रब केले जाते.  


चेहऱ्यावर स्क्रब कसा करावा? 


चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा स्क्रब करण्यापूर्वी हे लक्षात घ्या की हा स्क्रब फक्त आठवड्यातून एकच वेळा करायचा आहे. त्यापेक्षा जास्त वेळा नाही. तसेच हा स्क्रब चेहऱ्यावर घासून नाही तर हलक्या हाताने करायचा आहे. तसेच, स्क्रबची वेळ लक्षात ठेवा. तुम्हाला फक्त 1 मिनिट चेहरा स्क्रब करायचा आहे. 


'या' गोष्टींपासून तुम्ही स्क्रब करू शकता : 


कॉफी स्क्रब :


चेहऱ्यासाठी बनवलेल्या स्क्रबमध्ये हे सहज बनवलेले अतिशय प्रभावी स्क्रब आहे. कॉफी स्क्रब बनवण्यासाठी आधी एक चमचा कॉफी पावडर घ्या. यानंतर अर्ध्या चमचेपेक्षा थोडे कमी खोबरेल तेल घाला आणि आवश्यकतेनुसार कोमट पाणी घाला. त्याची घट्ट पेस्ट झाली कीह हा स्क्रब हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा आणि 1 मिनीटांनी चेहरा धुवून टाका. 


टोमॅटो आणि साखरेचा स्क्रब : 


टोमॅटोमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला मुरुम, डाग यांसारख्या समस्यांपासून दूर ठेवतात. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीन असते, जे त्वचेसाठी आरोग्यदायी मानले जाते. टोमॅटोमध्ये जर तुम्ही साखर मिक्स करून त्वचेला लावले तर काही मिनीटांतच तुम्हाला फरक जाणवेल. तुमची त्वचा उजळेल. 


साखर स्क्रब :


या स्क्रबसाठी तुम्ही साधी साखर तसेच ब्राऊन शुगर वापरू शकता. लक्षात ठेवा की वापरण्यापूर्वी, साखर काही काळ वितळू द्या नाहीतर चेहऱ्यावर फक्त साखरेचे छोटे तुकडे लावा. मोठ्या तुकड्यांमुळे त्वचेलाही नुकसान होऊ शकते. तुम्हाला साखर घ्यावी लागेल आणि त्यात खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल मिसळावे लागेल आणि या स्क्रबने चेहरा एक्सफोलिएट करावा लागेल. तुम्हाला हवे असल्यास, लिंबू साखर मिसळून देखील एक स्क्रब तयार केला जाऊ शकतो. 


ग्रीन टी स्क्रब :


ग्रीन टीपासून बनवलेले स्क्रब चेहऱ्यावरील घाण घालवण्यासोबतच उन्हापासून होणाऱ्या नुकसानापासूनही संरक्षण करते. स्क्रबसाठी ग्रीन टी बॅग घ्या आणि त्यात गरम पाणी घाला. आता त्यात एक चमचा खोबरेल तेल टाकून चेहरा स्क्रब करा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


महत्वाच्या बातम्या :