Skin Care Tips : जर तुम्हाला ग्लोईंग त्वचा (Skin Care Tips) हवी असेल आणि तुम्ही तुमच्या आहाराकडे लक्ष देत नसाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक असू शकते. जर तुम्ही योग्य संतुलित आहार घेतला तर तुमची त्वचा निरोगी राहील. ग्लोईंग त्वचा मिळविण्यासाठी आपण अनेकदा पार्लर आणि महागड्या प्रोक्ट्सकडे वळतो. पण, सत्य पूर्णपणे वेगळे आहे. यासाठी शरीर आतून निरोगी असणं गरजेचं आहे.


शरीर निरोगी ठेवल्याने आणि पौष्टिक आहार घेतल्याने आपली त्वचा आपोआप आतून ग्लो करते. आपण जर आपल्या आरोग्याची आणि खाण्याच्या सवयींची काळजी घेतली तर आपले शरीर आतून मजबूत तर होईलच पण आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येईल. नैसर्गिक ग्लोईंग त्वचा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करू शकता.


रताळे खा, रोगांपासून दूर राहा


रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. हे आपल्या त्वचेच्या खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करते. हिवाळ्यात उपलब्ध असलेल्या या खाद्यपदार्थाला सुपरफूड असेही म्हणतात. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे याला तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता. त्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते तेलाशिवाय बनवू शकता. ज्यामुळे ते आणखी आरोग्यदायी बनते.


नट्स आणि बिया


नट्स आणि बिया नेहमीच आरोग्याचा खजिना मानले जातात. तुम्ही नट्स हवे तसे खाऊ शकता. गोड पदार्थांत, फ्रूट सॅलडमध्ये तसेच तुम्ही साधेही ड्रायफ्रूट्स खाऊ शकता. तसेच,  तुम्ही त्यांना रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाऊ शकता. यासाठी तुम्ही बदाम, अंजीर, मनुके आणि ड्राय फ्रूट्स एका भांड्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या आणि भिजवलेले ड्रायफ्रुट्स खा. यामुळे तुमची त्वचा चमकदार तर होईलच पण तुमची रोगप्रतिकारशक्तीही वाढेल.


हिरव्या पालेभाज्या खा


हिरव्या पालेभाज्या केवळ तुमची त्वचा ग्लो करत नाही तर अनेक गंभीर आजारांपासून तुमचे रक्षण करतात आणि तुमची प्रतिकारशक्ती देखील वाढवतात. खरंतर, व्हिटॅमिन ए आणि सी बरोबर अनेक आवश्यक खनिजे आणि पोषक तत्वे हिरव्या भाज्यांमध्ये आढळतात. याशिवाय, ते अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असतात. हिरव्या भाज्या आपल्या शरीरात कोलेजन तयार करण्यास मदत करतात ज्यामुळे आपली त्वचा चमकदार होते.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : हिवाळ्यात ज्यूस पिणं आरोग्यदायी आहे का? आयुर्वेदात काय म्हटलंय? वाचा सविस्तर