Bitter Gourd Seed Benefits : कारल्याच्या बिया त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. यातील जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात. आयुर्वेदातही कारल्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. मात्र कारल्याची चव ही कडू असल्यामुळे अनेकजण ते खाणे टाळतात. कडूपणामुळे अनेकांना कारलं खायला आवडत नाही. अशा कारल्याचा कडूपणा दूर करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. तसेच आरोग्याच्या दृष्टीने कारल्याचे अनेक फायदेही आहेत. कारल्याच्या बियांचा फेस पॅक लावल्याने त्वचा सुधारते आणि चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होण्यास देखील मदत होते. कारल्याच्या बियांमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असलेल्या त्वचेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते आणि त्वचा तरुण ठेवण्यास मदत होते. त्यामुळे निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी तुम्ही कारल्याच्या बियांचा फेस पॅक वापरून पाहू शकता. चला तर जाणून घेऊयात कारल्याच्या बियांचा फेस पॅक कसा बनवायचा?
कारल्याच्या बियांचा पॅक कसा बनवायचा ते जाणून घ्या
साहित्य:
2 चमचे कारल्याच्या बिया
1 चमचा मध
1 चमचा दही
कारल्याच्या बियांचा फेस पॅक तयार करण्याची पद्धत
- सर्वात आधी, कारल्याच्या बिया चांगल्या प्रकारे धुवून घ्या. त्या मिक्सरमध्ये बारीक करा.
- आता त्यात मध आणि दही घालून मिक्स करा.
- ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे राहू द्या.
- त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
- आठवड्यातून 2-3 वेळा असे केल्याने त्वचा मुलायम, चमकदार आणि तजेलदार दिसेल.
- हा पॅक 1 आठवड्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता येतो.
कारल्याच्या बिया त्वचेवर लावल्याने अनेक फायदे होतात.
- व्हिटॅमिन ई समृद्ध कारल्याच्या बिया त्वचेला हायड्रेट ठेवतात आणि ती मऊ करतात.
- अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींना मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून वाचवतात आणि वृद्धत्व टाळतात.
- व्हिटॅमिन सी त्वचेमध्ये कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचेची वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.
- ओमेगा 3 फॅटी अॅसिड त्वचेची आर्द्रता राखते.
- मॅग्नेशियम आणि झिंकमुळे ते मुरुम आणि डाग कमी करते.
- कारल्याच्या बिया त्वचेला खोलवर स्वच्छ करतात आणि त्यात चमक आणतात.
- त्यामुळे कारल्याच्या बिया लावल्याने त्वचा निरोगी, सुंदर आणि तरुण दिसते.
रक्त शुद्ध करण्यासाठी कारले हे उत्कृष्ट मानले जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. जे रक्त शुद्ध करण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये अँटी-ऑक्सिडंट घटक देखील आढळतात जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :