Health Tips : उन्हाळ्यात चेहऱ्यावर सनबर्न, पिंपल्स आणि पुरळ उठू लागतात. उन्हाळ्यात चेहरा वारंवार धुतल्यानंतरही चेहरा तेलकट आणि निस्तेज होतो. कडक सूर्यप्रकाश टाळण्यासाठी अनेक लोक चेहरा झाकतात, सनस्क्रिन लावतात यांसारखे अनेक उपाय करतात. पण त्यानेही तितकासा परिणाम होत नाही. पण या ऋतूत जर तुम्ही पुदिन्याचे पाणी प्यायले तर तुम्हाला त्याचे अनेक फायदे होतील. उन्हाळ्यात खूप घाम येतो. अशा वेळी तुम्ही पुदिन्याचे पाणी पिऊ शकता. यासाठी तुमच्या पाण्याच्या बाटलीत पुदिन्याची काही पाने टाकून ठेवा.  हे पाणी 5-6 तास ही पाने पाण्यात ठेवा. तुम्हाला हवे असल्यास त्यात लिंबाचे तुकडे आणि पुदिना दोन्ही टाकू शकता. याचे फायदे नेमके काय आहेत ते जाणून घ्या. 


पुदिन्याच्या पाण्याचे फायदे :


उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सतत पाणी प्यायला हवे. तुम्ही तुमच्या बाटलीच्या पाण्यात काही पुदिन्याची पाने टाकू शकता. ताज्या पुदिन्याची चव सर्वांनाच आवडते, याशिवाय असे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.


1- पिंपल्सपासून सुटका - कडक उन्हानंतर आता आर्द्रता, चिकटपणा आणि घामामुळे अनेक समस्या येतात, या काळात ज्यांची त्वचा तेलकट असते, त्यांना पिंपल्सच्या समस्येला सामोरे जावे लागते. पुदिन्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुम येत नाहीत.


2- त्वचा राहील निरोगी - उन्हाळ्यात चेहरा निर्जीव होतो. त्वचेची चमक नाहीशी होते, अशा स्थितीत जर तुम्ही नियमितपणे पुदिन्याचे पाणी प्यायले तर तुमची त्वचा एकदम फ्रेश राहते. पुदिन्यात दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे उन्हाळ्यात तुमची त्वचा निरोगी ठेवतात.
 
3 - पोटासाठी फायदेशीर - उन्हाळा आणि पावसात आपली पचनसंस्था खूप कमकुवत होते. पुल्टा उलटा खाल्ल्यास पोटात अॅसिडची समस्या सुरू होते. पण जर तुम्ही पुदिन्याचे पाणी प्याल तर त्याचा फायदा तुम्हाला गॅस, जळजळ किंवा पोटाच्या इतर कोणत्याही समस्यांमध्येही होतो. पुदिन्यात मेन्थॉल असल्यामुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित चालते. याशिवाय पुदिन्याचे पाणी प्यायल्याने पोटही चांगले राहते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha