Anil Desai On Devendra Fadnavis: हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी प्रत्युत्तर दिलंय. ईफ्तार पार्टीत बिर्याणीवर ताव मारणाऱ्याला जनाब म्हणतात, असा शब्दात अनिल देसाई यांनी नाव न घेता फडणवीसांना टोला लगावलाय. 


दरम्यान आज नांदेड येथे शिवसंपर्क अभियान व कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान अनिल देसाई पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की "आमची ओळख ही हिंदुत्व आहे. राजकारणात हिंदुत्वाचा वापर करण्याची इतरांना गरज आहे, शिवसेनेला याची गरज नाही. तर, त्यांनाच हिंदुत्वाच्या कुबड्याची गरज आहे", असा शब्दात अनिल देसाईंनी भाजपवर निशाणा साधलाय. 


शिवसेनेला काश्मीर पाईल्स चित्रपट पाहण्याची गरज नाही
काश्मीर फाईल्स हा चित्रपट पाहण्याची शिवसेनेला गरज नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी कश्मीरी पंडितांसाठी आणि तेथील प्रत्येकसाठी जे बोलले, ते केलंय. महाराष्ट्रात त्यांना निर्वासित म्हणून घेण्याची वेळ, त्यांना आदर अतिथ्य दाखविणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब होते. आजही कश्मीरी पंडित छाती ठोकपणे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतोय. त्यामुळं अम्हाला कश्मीरी फाईल्स पाहण्याची आजिबात गरज नसल्याचे अनिल देसाई यांनी म्हटलंय. तसेच शिवसेना शेतकऱ्यांसोबत सदैव उभी असून शिवसेना पुरोगामी विचारांसहित महाराष्ट्राला पुढे नेत असल्याचे ते म्हणाले.


शिवसेना कोणत्याही समाजाला मागं सोडणार नाही 
हिजाब घालण्याचा भाजपा नेते अनिल बोडेच्या वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका मांडताना अनिल देसाई यांनी सांगितलं की, प्रत्येकाला व्यक्तीला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे .त्यांनी त्याचे विचार मांडले. शिवसेना वेगळया विचारानं चालणारी संघटना आहे. पुरोगामी महाराष्ट्राला एकनंबरचे राज्य बनवत पुढे नेत आहे. त्यामुळं शिवसेना कोणत्याही समाजाला मागं सोडणार नाही. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha