Skin Care Tips : आपला चेहरा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी आपण अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने वापरतो. पण, या महागड्या क्रीम्सचा वापर करूनही आपल्याला हवे तसे परिणाम मिळत नाहीत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे रसायने. बाजारात मिळणाऱ्या सौंदर्य उत्पादनांमध्ये आढळणाऱ्या रसायनांमुळे चेहऱ्यांचे खूप नुकसान होते. हे टाळण्यासाठी तुम्ही घरातच उपलब्ध असणाऱ्या वस्तू वापरू शकता. त्यापैकी एक म्हणजे मलाई. चेहरा डागरहित आणि मुलायम बनवण्यासाठी मलाई अतिशय प्रभावी आहे. चला तर मग जाणून घेऊया चेहऱ्यावर मलाई लावण्याचे फायदे आणि पद्धती.
त्वचेला करते मॉइश्चरायझ
दुधात असलेल्या मलाईमध्ये भरपूर फॅट असते. हे त्वचेला आतून मॉइश्चरायझ करण्यास मदत करते. यासोबतच त्वचेवरील सर्व मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते. यासाठी तुम्ही एक चमचा मलाई घेऊन ती हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा आणि किमान 15 मिनिटे मसाज करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.
त्वचा चमकदार बनवा
मलाई त्वचेला मॉइश्चरायझिंग करण्यासोबतच चमकण्यासही मदत करते. मलाईमध्ये अर्धा चमचा मध मिसळा. हे मिश्रण चेहऱ्याला लावून 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.
मुरुम आणि मुरुमांची समस्या दूर करते
मुरुम आणि मुरुमांमुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य कमी होते. यावर उपाय म्हणून तुम्ही मलाई वापरू शकता. मलाई अशा समस्या मुळापासून दूर करून त्वचा तजेलदार आणि चमकदार बनवण्यास मदत होते. मलाईमध्ये असलेले प्रोटीन त्वचेच्या मृत पेशी काढून टाकून नवीन पेशींची वाढ वाढवण्यास मदत करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- Trending : बॉसला वैतागलेल्या महिलेने पेटवले तेलाचं गोदाम; कारण ऐकून चकीत व्हाल!
- Parade of Planets : अवकाशात दिसणार ग्रहांची परेड, पाच ग्रह एकाच रांगेत; जाणून घ्या कारण...
- Sharad Pawar : शरद पवार आणि किस्से... एक अद्भुत समीकरण - वाचा काही गाजलेले किस्से
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha