Skin Care Tips : आपली त्वचा (Skin) चमकदार, स्वच्छ आणि तरुण ठेवण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध असलेले अनेक प्रोडक्ट्स वापरतो. इतकेच नाही तर आपण नियमित स्किन केअर रूटीनचे पालन करतो. पण, अशा काही गोष्टी आहेत ज्या केल्याने आपल्या चेहऱ्याचे नुकसान होते. या सवयी कदाचि आपल्याला माहीतही नसतात. या ठिकाणी आपण अशाच काही चुकीच्या सवयींबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.


जर तुम्ही रोज ओट्स खाल्ले तर


सकाळच्या ब्रेकफास्टसाठी एक वाटी ओट्स खाणे हा तुमचा दिवस सुरू करण्याचा एक चांगला मार्ग आहे. पण दररोज असे करून तुम्ही तुमच्या शरीराला आणि त्वचेला नुकसान पोहोचवत आहात. नियमित ओट्सचं सेवन केल्याने तुमची त्वचा कोरडी होऊ शकते.


जर तुम्ही जास्त वेळ अंघोळ केली


दररोज विनाकारण गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेला खूप नुकसान होते. गरम पाणी त्वचेचा ओलावा काढून टाकते, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होते. बरेच लोक गरम पाण्याने चेहरा धुतात. ही सवय चुकीची आहे. त्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या झपाट्याने वाढतात.


सकाळी उठल्याबरोबर कॉफी प्या


बर्‍याच लोकांची सकाळ एक कप गरम कॉफीशिवाय सुरू होत नाही. पण जर तुम्ही रोज नाश्त्यापूर्वी कॉफी प्यायलात तर तुमच्या त्वचेचं नुकसान होऊ शकते. सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने तुमच्या पोटात जळजळ होऊ शकते.  तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात.


सनस्क्रीनचा वापर करत नाही


सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यावर सनस्क्रीन (Sunscreen) क्रीम वापरणे हा एक चांगला पर्याय आहे. सनस्क्रीन लावल्याने त्वचेचा बाहेरील थर सुरक्षित राहतो आणि चेहऱ्यावर आरोग्यदायी चमक येते. सनस्क्रीन आपल्या त्वचेवर एका थरासारखे कार्य करते जे आपल्या त्वचेला तीव्र सूर्यप्रकाशाने होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी असतात. जसे की, झिंक ऑक्साईड, टायटॅनियम ऑक्साईड. हे आपल्या त्वचेचे वृद्धत्वाच्या प्रभावापासून म्हणजे अकाली वृद्धत्व आणि सूर्यप्रकाशापासूनही संरक्षण करते.


तुम्ही त्याच स्किन केअर रूटीनचे पालन करता


रोज चेहऱ्यावर तेच तेच प्रोडक्ट्स लावल्याने देखील तुमच्या चेहऱ्याचे नुकसान होते. तुमची त्वचा उत्तम दिसण्यासाठी त्यात वेळोवेळी ऋतूनुसार बदल करणं गरजेचं आहे. 


तुम्ही चुकीचा फेस वॉश वापरता


सकाळी उठल्यानंतर जर तुमची त्वचा तेलकट दिसत असेल, तर हार्ड क्लिन्झर वापरू नका. लाईट क्लिंजर वापरून कोमट पाण्याने चेहरा धुतला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल.  


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : कोमट पाण्यात मध मिसळून रिकाम्या पोटी प्या; वजन कमी होण्याबरोबरच आरोग्याला मिळतील अनेक फायदे