Skin Care : देशातील सुप्रसिद्ध कथाकार अर्थातच मोटिवेशनल स्पीकर जया किशोरी या अनेकदा चर्चेत असतात. त्यांचे भाषण ऐकण्यासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी जाणून घेण्यातही लोकांना खूप रस असतो. जया किशोरी यांचे प्रेरक भाषण सर्वांना प्रेरित करते. जीवन योग्य पद्धतीने जगण्याची प्रेरणा देते. मात्र जया किशोरीचे केवळ शब्दच नाही तर त्यांचा चमकणारा चेहराही अनेकदा लोकांचे लक्ष वेधून घेतो. अशात मनात प्रश्न येणं साहजिक आहे की, त्या असं काय करतात? की ज्यामुळे त्यांचा चेहराही इतका चमकतो? जर तुम्हाला चेहऱ्यावरील निस्तेजपणा आणि डागांमुळे त्रास होत असेल, तर जया किशोरीसारखी नितळ आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी हा फेस पॅक लावा. स्वत: जया किशोरीने तिच्या चमकणाऱ्या चेहऱ्याचे रहस्य लोकांसोबत शेअर केले आहे. 



जया किशोरींचे स्किन केअर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल


स्वत: जया किशोरीने तिच्या चमकणाऱ्या चेहऱ्याचे रहस्य लोकांसोबत शेअर केले. त्यांचे स्किन केअर पॉडकास्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. जया किशोरी सांगतात की ती रोज आपल्या चेहऱ्यावर दही आणि बेसनचे मिश्रण लावते जया किशोरी यांच्या त्वचेची काळजी घेण्याचा दिनक्रम विशेष आहे, जया किशोरी सांगते की, ती दोन चमचे दही, बेसन आणि चिमूटभर हळद मिसळून फेस पॅक बनवते. तसेच, ती रोज रात्री झोपण्यापूर्वी हा फेसपॅक लावते आणि झोपण्यापूर्वी तिचा चेहरा स्वच्छ पाण्याने धुते. यामुळे चेहऱ्यावरील सर्व घाण आणि काळेपणा निघून जातो. फेस पॅक काढून टाकल्यानंतर, चेहरा चांगला मॉइश्चरायझ करा आणि मॉइश्चरायझर लावत असल्याचंही त्या सांगतात.


 


 






 


वयाच्या 27 व्या वर्षी भारतात आणि परदेशात प्रसिद्ध


जया किशोरी यांचा जन्म 13 एप्रिल 1995 रोजी राजस्थानच्या सुजानगढ येथे झाला. वयाच्या 27 व्या वर्षी त्या भारतात आणि परदेशात प्रसिद्ध झाल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. भारतातील विविध राज्यांव्यतिरिक्त त्या परदेशातही जाऊन कथा कथन करतात.


 


हेही वाचा>>>


Beauty Secret : कियारा, करीना सारख्या अभिनेत्रींच्या ग्लोइंग स्कीनचे रहस्य माहित आहे? जाणून घ्या, एकदा ट्राय करा..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )