Skin Care : डोक्यावर आग ओकणारा सूर्य, लालबुंद ऊन, अंगातून निघणाऱ्या घामाच्या धारा.. उन्हाळा (Summer) म्हटलं की असं काहीसं वातावरण असतं.. यामुळे त्वचेवरील चमक निघून जाते, या ऋतुत चेहऱ्याचा रंग निखळतो आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या सुरू होतात. या ऋतूमध्ये स्त्रिया त्यांच्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आणि चमकदार त्वचेसाठी अनेक प्रकारची उत्पादने वापरतात. त्या अनेक घरगुती उपायांचा वापर करतात आणि फेस पॅक देखील वापरतात. तुम्हालाही उन्हाळ्यात चमकदार त्वचा मिळवायची असेल तर तुम्ही हे घरगुती फेस पॅक वापरू शकता. जाणून घ्या सविस्तर...


पपई जेल आणि चंदन पावडर


तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तुम्ही पपई जेल आणि चंदन पावडरच्या मदतीने घरी फेस पॅक बनवू शकता. पपईमध्ये अँटिऑक्सिडेंट्स आणि बायोफ्लेव्होनॉइड्स असतात. जी मुरुमे दूर करतात आणि चेहरा स्वच्छ करतात. चंदनातही अनेक गुणधर्म आहेत.


अशा प्रकारे वापरा


बाजारातून पपईचे जेल आणा


त्यात चंदन पावडर मिसळा.


पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा धुवा


पपईचे जेल आणि चंदन पावडरची पेस्ट चेहऱ्यावर लावा.


फेसपॅक सुकल्यानंतर चेहरा धुवा.


यानंतर चेहरा मॉइश्चरायझ करा.


आठवड्यातून एक ते दोन दिवस हा फेसपॅक लावा.


दही, बेसन आणि मध


उन्हाळ्यात त्वचा ग्लोईंग बनविण्यासाठी दही, बेसन आणि मध मिसळून फेस पॅकचा वापर केला जाऊ शकतो. दह्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते, तर दह्याचा वापर चेहरा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. बेसनामध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्त्वे, फायबर असे अनेक गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि ते चेहऱ्यासाठीही वापरता येतात. त्याचबरोबर मधामध्ये अनेक प्रकारचे गुणधर्म असतात जे आरोग्यासाठी तसेच चेहऱ्यासाठीही फायदेशीर असतात.


अशा प्रकारे वापरा


दही, बेसन आणि थोडे मध एकत्र करून पेस्ट बनवा.



पेस्ट लावण्यापूर्वी चेहरा धुवा.



चेहरा धुतल्यानंतर पेस्ट चेहऱ्यावर लावा.



फेसपॅक सुकल्यानंतर चेहरा धुवा.



चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझ करा.



आठवड्यातून एक ते दोन दिवस हा फेसपॅक लावा.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Fashion : एक तर उन्हाळा, त्यात लग्नाचा सीझन, 'Dont Worry!' कूल दिसण्यासाठी लेहेंग्याच्या डिझाईन्स एकदा पाहाच...