Beauty Tips : चेहरा आणि शरीराची त्वचा चमकदार करण्यासाठी तुम्ही आळशीच्या बियांचा वापर करू शकता. या बियांमध्ये अनेक गुणधर्म आहेत यामुळे तुम्हाला चमकदार आणि सुंदर त्वचा मिळू शकते. आळशीपासून बनवलेले पॅक त्वचेवरही अत्यंत प्रभावी आहे. यामध्ये त्वचेसाठी वृद्धत्वविरोधी, दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. आळशीपासून बनवलेला फेस पॅकमुळे तुमची त्वचा नेहमी तरूण आणि चमकदार राहते.

आळशीच्या बिया बारीक करून त्याची पावडर बनवा. तुम्ही ही पावडर अधिक प्रमाणात बनवून साठवू शकता. मात्र ही पावडर काचेच्या बरणीत ठेवा आणि केवळ सात दिवसांमध्ये वापरा.

असा बनवा फेस पॅक

आळशी पावडरमध्ये अर्धा चमचा चंदन पावडर एक चिमूट हळद, गुलाब पाणी,एक टीस्पून दही टाकून हे सर्व मिश्रण एकत्र करा. हा पॅक फक्त 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. जर तुमची त्वचा जास्त कोरडी असेल तर तुम्ही दह्याऐवजी मध देखील वापरू शकता.

आळशीच्या फेस पॅकचे फायदे

  • आळशी त्वचेवर लावल्याने वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात.
  • हा फेस पॅक तुमची त्वचा घट्ट ठेवते, यामुळे त्वचा तरुण राहते.
  • सुरकुत्या दूर होतात आणि त्वचेची चमक कायम राहते.
  • या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते, जे त्वचेची जळजळ दूर करते.
  • या फेस पॅकमुळे त्वचेवरील डाग नाहीसे होतात.

अत्यंत गुणकारी आळशी

आळशीच्या बिया शरीरातील ऊर्जा वाढवण्याचे काम करतात. याच्या नियमित सेवनाने केस मजबूत आणि दाट होतात आणि त्वचेसाठीही हे फायदेशीर आहे.

  • त्वचा हायड्रेटेड राहते.
  • त्वचा निरोगी राहते.
  • त्वचेची चमक कायम ठेवते.
  • त्वचा गोरी होण्यास मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha