Safety Tips For Kitchen : बहुतेक लोक आपल्या सुट्टीचा वेळ मुलांसोबत घालवतात. मुलांसोबत वेळ घालवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे त्यांना तुमच्या कामाचा भाग बनवणे. बरेच लोक त्यांच्या मुलांना  स्वयंपाकाचा एक भाग बनवतात म्हणजेच लहान मुलांना सोबत घेऊन स्वयंपाक बनवतात. मुलांना देखील आईसोबत जेवण बनवायला आवडते. पण, मुलांसोबत स्वयंपाक करण्यासाठी किंवा स्वयंपाकघरात वेळ घालवण्यासाठी काही नियम आणि आयडिया फाॅलो करणे फार महत्वाचे आहे. मुलांना सोबत घेऊन स्वयंपाक बनवत असाल तर या काही महत्वाच्या टिप्स फाॅलो करा.


- ज्या स्टोव्हवर तुम्ही अन्न शिजवत आहात तो लहान मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा. त्यांचा हात स्टोव्हपर्यंत पोहोचला तर ते धोकादायक आहे. आजूबाजूला कुठलाही स्टूल किंवा खूर्ची अशी कोणतीही वस्तू नसल्याचा प्रयत्न करा. जिच्यावर चढून लहान मुले स्टोव्हपर्यंत पोहोचू शकणार नाही. 


- स्वयंपाकघरात अनेकदा घाण किंवा तेल किचन कट्ट्यावर चिकटून राहते आणि अशा वेळी मुलांना तिथे आणणे योग्य नाही. घाणेरड्या वस्तूंना स्पर्श केल्यास ते आजारीही पडू शकतात. म्हणूनच स्वयंपाकघर नियमितपणे स्वच्छ करा आणि तेथील डस्टबिन बॉक्स कायम बंद करून ठेवा.





- मुलाला कधीही एकटे सोडू नका. एकतर त्यांना घरातील इतर व्यक्तीकडे द्या किंवा स्वयंपाकघरातून बाहेर जाण्यास सांगा. नंतर स्वयंपाकघरचे दार बंद करा. ज्यामुळे लहान मुलं किचनमधील वस्तूंना हात लावू नाही शकणार.

 

- मुलांना स्वयंपाकघरातील वस्तूंना खेळायला आवडते. अशा परिस्थितीत, त्याला स्वयंपाकघरातील प्रत्येक डबा उघडायचा असतो आणि प्रत्येक भांड्याचे झाकण काढायचे असते. मूल जेव्हा स्वयंपाकघरात असते तेव्हा तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवावे.

 


- जर तुम्ही तुमच्या मुलांसोबत स्वयंपाक करण्याची योजना आखत असाल तर अर्ध्याहून अधिक रेसिपी आधीच तयार करा. यामध्ये भाज्या चिरणे, ग्रेव्ही बनवणे यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. याचा फायदा असा होईल की जेव्हा मूल स्वयंपाकघरात असेल तेव्हा तुमचे पूर्ण लक्ष त्याच्याकडे असेल. तुम्ही मुलाशी शक्य तितका संवाद साधू शकाल.


- अन्न तयार करण्यापूर्वी, हात धुणे आणि स्वच्छता राखणे किती महत्वाचे आहे हे त्यांना शिकवा. 


- स्वयंपाक करताना लहाम मुलांना सिलेंडरपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच सिलेंडरकरता एक वेगळी जागा तयार करा.


 


इतर महत्वाच्या बातम्या