Smartphones EMI Purchasing Tips : बहुतांश ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि रिटेल स्टोर्सवर आता EMI चा पर्याय मिळतो. EMI द्वारे स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सहज खरेदी करता येतात. या प्लॅटफॉर्म्सवरून वेगवेगळ्या बँकांद्वारे 3 ते 36 महिन्यांच्या ईएमआयवर समार्टफोनसह इतर वस्तू खरेदी (Purchase) करता येतात. ही ऑफर डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सवर मिळते. सध्या ईकॉमर्स (E-commerce) वेबसाइटवरून (Website) अनेक जण डिस्काउंट (Discount) पाहून मोबाईलसह इतर वस्तू खरेदी करतात. यात तुम्ही महागडे स्मार्टफोनही (Smartphones) मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. खरं तर अशी एक ट्रिक आहे जी कोणत्याही स्मार्टफोनवर तुमचे हजारो रुपये वाचवू शकते आणि आज आम्ही तुम्हाला त्या ट्रिकबद्दल सांगणार आहोत.


ज्यावेळी आपण स्मार्टफोन्स खरेदी करायला जातो त्यावेळी ते अनेकदा महाग असतात आणि मग इच्छा असूनही  तुम्ही तो खरेदी करत नाही किंवा काही वेळानंतर तुमचे बजेट तयार झाल्यावर तुम्हाला तो खरेदी करावा लागतो. पण आता लोकांनी EMI वरही स्मार्टफोन खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामध्ये तुम्हाला ठराविक महिन्यांपर्यंत पैसे द्यावे लागतात. किती महिन्यांचा EMI करायचा हे तुम्ही स्वच्छेने ठरवू शकता.  EMI वर स्मार्टफोन खरेदी करून तुम्हाला बंपर डिस्काउंट (Bumper Discount) मिळू शकते आणि जर स्मार्टफोनची रक्कम 1 लाख रुपये असेल तर तुम्ही त्याच्या किंमतीत 10,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. वास्तविक स्मार्टफोनच्या खरेदीवर काही बँक (Bank) ऑफर्स दिल्या जातात, ज्याचा वापर करून तुम्ही 10 टक्के पर्यंत सूट मिळवू शकता.


तथापि, जेव्हाही तुमच्याकडे एखाद्या विशिष्ट बँकेचे क्रेडिट (Credit) किंवा डेबिट (Debit) कार्ड असेल तेव्हा तुम्ही या ऑफरचा (Offer) लाभ घेऊ शकता कारण प्रत्येक बँक ही ऑफर देत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही मासिक हप्त्यांवर स्मार्टफोन खरेदी करत असाल, तर ज्या बँकेच्या कार्डवर ऑफर दिली जात आहे यावर मासिक हप्त्याचा (EMI) पर्याय निवडा. असे केल्यास तुम्ही खूप बचत करू शकाल. जर तुम्हाला मासिक हप्त्याने स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्हाला दर महिन्याला एक ठराविक रक्कम भरावी लागेल. सोबतच तुम्हाला बँकेकडून मासिक हप्त्यावर दिले जाणारे विविध आकर्षक डिस्काउंट देखील तुम्हाला मिळू शकते.


इतर महत्वाच्या बातम्या


Mamaearth च्या आयपीओ मूल्यांकनावरून गोंधळ; कंपनीचे सहसंस्थापक मदतीला, वाचा सविस्तर घडलं काय