Valentine's Week Full List 2023:  प्रेमी युगुलांसाठी 14 फेब्रुवारी हा दिवस खास असतो. 14 फेब्रुवारीला कपल्स व्हॅलेंटाईन-डे (Valentine's Day) साजरा करतात. व्हॅलेंटाईन-डेच्या आधी एक आठवडा वेगवेगळे डेज साजरे केले जातात. व्हॅलेंटाईन-डेच्या आधी रोज डे (Rose Day), प्रपोज डे (Propose Day), चॉकलेट डे (Chocolate Day), टेडी डे (Teddy Day), प्रॉमिस डे (Propose Day),  हग डे (Hug Day), किस डे (Kiss Day) साजरे केले जातात. जाणून घेऊयात या व्हॅलेंटाईन्स वीकबाबत...


रोज डे (Rose Day)  7 फेब्रुवारी  


व्हॅलेंटाईन्स वीकची सुरुवात रोज-डेनं होणार आहे. बाजारात लाल, पांढऱ्या, पिवळ्या, गुलाबी रंगाचे गुलाब उपलब्ध असतात. जर तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला गुलाब देऊन तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर तुम्हाला त्या गुलाबाच्या रंगाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. लाल रंगाचे गुलाब हे प्रेमाचे प्रतिक आहे.नारंगी गुलाब हे प्रेमातील ऊर्जा, उत्कटता आणि उत्साह या सर्व गोष्टींचे प्रतिक आहे. पिवाळ्या रंगाचा गुलाब हे मैत्री आणि आनंदाचे प्रतिक आहे.पांढरा गुलाब हे  शुद्धता, निर्दोषता, कृपा आणि नम्रता या गोष्टींचे प्रतिक आहे. 


प्रपोज डे (Propose Day) 8 फेब्रुवारी 


8 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी तुम्ही एखाद्या व्यक्तिला प्रपोज करुन आपल्या मनातील भावना सांगू शकता. जर तुम्हाला तुमचं प्रेम वेगळ्या अंदाजात व्यक्त करणार असाल तर मग त्या व्यक्तीला एखाद्या सुंदर ठिकाणी घेऊन जाऊन रिंग किंवा गुलाब देऊन तुम्ही प्रपोज करु शकता. 


चॉकलेट डे (Chocolate Day) फेब्रुवारी 9  


'व्हॅलेंटाईन वीक'चा आज तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला व्हाईट चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट देऊ शकता. 


टेडी डे (Teddy Day) फेब्रुवारी 10 


एखाद्या व्यक्तीबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी टेडी डे साजरा केला जातो. तुम्हाला तुमच्या भावना किंवा प्रेम व्यक्त करायचे असेल तर त्यांना 'टेडी डे' ला टेडी गिफ्ट करावा. टेडी हा प्रेम, काळजी आणि आपुलकीचे प्रतिक आहे.


प्रॉमिस डे (Promise Day) फेब्रुवारी 11


'प्रॉमिस डे' दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनरला काही वचन देऊ शकता. जेव्हा  कपल्स एकमेकांना वचन देतात, तेव्हा ते या वचनाद्वारे त्यांच्या नात्यामधील प्रामाणिकपणा आणि प्रेम दर्शवतात. 


हग डे(Hug Day) February 12 


12 फेब्रुवारीला ‘हग डे’ साजरा केला जातो. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला तुम्ही मिठी मारुन आपल्या भावना व्यक्त करु शकता. 


किस डे (Kiss Day) February 13 


व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस म्हणजे किस डे. किस डेच्या नंतर व्हॅलेंटाईन-डे साजरा केला जातो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :  


Valentine Day 2023 : 'व्हॅलेंटाईन डे'ला पार्टनरसाठी गिफ्ट घ्यायचंय? 'या' बॉलिवूड कपल्सच्या आयडिया फॉलो करा