बाप कधी होणार? जॉनचं उत्तर...
एबीपी माझा वेब टीम | 25 Jun 2016 03:28 PM (IST)
मुंबई : बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम 2014 मध्ये प्रिया रुंचलसोबत लग्न बंधनात आडकला. लग्नाला दोन वर्षे होऊन सुद्धा तो अजून संतती सुखापासून लांब आहे. त्याला या संदर्भातच विचारले असता. त्याने अजून करिअरकडेच लक्ष देण्याची इच्छा असल्याचे सांगत संतती सुखापासून लांब राहण्याचे पसंत केले. अभिनेत्री तारा शर्माचा शो 'द तारा शर्मा'मध्ये नुकताच आला होता. या शोमध्ये त्याला संतती सुखासंबंधी विचारले असता तो म्हणाला की, ''आमचा दोघांचाही सध्या आपत्या जन्माचा विचार नसून आम्ही आमचे सर्व लक्ष करिअरकडे केंद्रीत केले आहे. तो पुढे म्हणाला की, ''मी सध्या एक फुटबॉल टीमचा ओनर आहे, तसेच एक प्रोडक्शन हाऊसचा मालकदेखील आहे. अभिनेता म्हणूनही माझ्या काही चित्रपटांचे काम सुरू आहे. त्यामुळे या सगळ्यांमधून मला सध्यातरी वेळ नाही.''