मुंबई : एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झाल्यानंतर त्याच्यावर उपचार म्हणून एकतर केमोथेरपीचा अवलंब केला जातो किंवा सर्जरी करून शरिरातील एकाच ठिकणी असलेले एका भागात असलेले कॅन्सरचे विषाणूला नष्ट केले जाते. मात्र, हे विषाणू जर संपूर्ण शरीरात वाढत असतील तर अशा स्टेजमध्ये या इम्युनोथेरपीचा अवलंब करून रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरा होऊ शकतो, असा दावा मुंबई आययटीतील बायोसायन्स अँड बायोइंजिनियरिंग विभागाचे प्राध्यापक डॉ. राहुल पुरवार यांनी केला आहे.

जगभरात कॅन्सरचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे जगभरात या आजारावर पर्यायी उपचारपद्धतीचा शोध सुरू असताना इम्युनोथेरपीसारखी उपचारपद्धती ही या आजारावर रामबाण उपाय ठरू शकते, असं आयआयटी मुंबईतील संशोधकांचा म्हणणं आहे. कॅन्सरचे विषाणू हे रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमी करते अशावेळी या रोगांच्या विषाणूंना रोखण्यासाठी किमोथेरपीसारख्या उपचारपद्धतींचा वापर होतो. मात्र, या थेरपीमध्ये रुग्ण उपचार घेत असताना मानसिकदृष्ट्या खचतो, इतकाच नाहीतर ही केमोथेरपी रुग्णासाठी अधिक त्रासदायक आहे. यावर तोडगा म्हणून आलेल्या या नवीन पद्धतीतमध्ये प्रतिकार शक्ती अधिक वाढविण्यात येणार असून थेट कर्करोगाच्या विषाणूला हेरून त्याचा प्रादूर्भाव होण्यापासून रोखले जाणार असल्याचे डॉ. पुरवार यांनी स्पष्ट केले.

इम्युनोथेरपीमुळे उपचारादरम्यान आणि त्यानंतर रुग्णांना होणारा त्रास कमी होईल आणि लाखो रुग्णांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या उपचारपद्धतीबाबत २०१७मध्ये सर्वप्रथम जागतिक पातळीवर चर्चा करण्यात आली होती. काही कंपन्यांनी परदेशातून याबाबतची उपकरणे खरेदी करण्याचेही ठरविले होते. यासाठी भारतातील रुग्णाला परदेशात इम्युनोथेरपीद्वारे उपचार घ्यायचा असल्यास 2 ते 3 कोटी रुपये खर्च करावे लागत होते.

मात्र, मुंबई आयआयटीतील या संशोधनमुळे भारतात ही उपचारपद्धती पुढील वर्षभरात रुग्णालयात सुरू करता येईल आणि याचा साधारण खर्च हा 15 ते 20 लाखापर्यंत येऊ शकतो, अशी माहिती डॉ. राहुल पुरवार यांनी दिली.

इम्युनोथेरपी ही मुख्यत्वे दोन प्रकारची आहे यामध्ये अँटी बॉडी बेस इम्युनोथेरपी आणि दुसरी सेल बेस इम्युनोथेरपी यामध्ये सेल बेस इम्युनोथेरपीद्वारे कॅन्सरचा प्रादुर्भाव कितपत रुग्णाल झाला आहे हे बघून या थेरपीद्वारे काही महिन्यात कॅन्सर रुग्ण पूर्ण पणे बरा होऊ शकेल. मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णलायत लवकरच ही थेरपीची सुरवात केली जाणार आहे. भविष्यात कॅन्सर रुग्णला एक नवं जीवन देणारी, आशा देणारी ही थेरपी असणार आहे.