Healthy Tea Tips : आजकाल प्रत्येकजण आपल्या आरोग्याच्याबाबतीत खूप सजग झाला आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, हे सर्वांनाच समजले आहे. अशा परिस्थितीत दररोज वापरण्यात येणारी साखर आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. अनेकांना विना साखरेचा चहा पिणे अवघड असते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही साखरेऐवजी वापरू शकता. हे घटक केवळ गोडच नाही तर, आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात आणि चहामध्ये नैसर्गिक गोडवा आणू शकतात. अर्थात नैसर्गिक गोडव्यासह तुम्ही हेल्दी चहा पिऊ शकता...


गूळ


जर, तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि चहा सोडू शकत नसाल, तर गुळाचा चहा प्या. गुळाचा गोडवा चहाची चव आणि रंग बदलतो. यासोबतच गुळात भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्याचबरोबर ते केमिकल्स फ्री असल्याने आरोग्यदायी देखील आहे.


बडीशेप


आपण चहामध्ये गोडव्यासाठी बडीशेप देखील घालू शकता. बडीशेप आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चहा प्यायल्यानंतर गॅस होत असेल, तर चहामधील बडीशेप यावर उत्तम उपाय ठरू शकते.


जेष्ठमध


आयुर्वेदिक औषधांमध्ये जेष्ठमधचाही वापर केला जातो. जेष्ठमध तुम्हाला घसादुखीपासून आराम देऊ शकतो. जेष्ठमध युक्त चहा बनवण्यासाठी या चहामध्ये लवंग आणि दालचिनीचा वापर केला जाऊ शकतो. हा हर्बल चहा आरोग्यासाठीही उत्तम आहे.


मध


मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नैसर्गिक गोडव्यासाठी तुम्ही तुमच्या चहामध्ये मध देखील घालू शकता. तो नैसर्गिक स्वीटनर म्हणून काम करतो. साखरेपेक्षा मध हा पर्याय अतिशय चांगला आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha