Recipe In Sawan : यंदा मंगळवारपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. मात्र यावेळचा श्रावणमास हा 18 जुलैपासून ते 16 ॲागस्ट 2023 असणार आहे. दरवर्षी श्रावण (Sharavan 2023) महिना देशभरातील लोकांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या महिन्याला एक अत्यंत शुभ महिना समजला जातो. पावसाळ्याला सुरुवात झाली की श्रावण महिना भारतात येतो. हा महिना पिकांच्या कापणीकरता चांगला मानला जातो.  हिंदू धर्मातील मान्यतांनुसार श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात अनेक पूजा विधी आणि व्रत केले जातात. या संपूर्ण महिन्यात येणार्‍या सर्व सोमवारी बहुतेक महिला आणि पुरुष उपवास ठेवतात. अनेक स्त्रिया संपूर्ण श्रावणाच्या प्रत्येक दिवशी भगवान शंकराची पूजा करतात आणि पाणी, दूध आणि बेलाची पाने अर्पण करतात. याच दिवशी अनेक महिला विविध उपवासाचे पदार्थ बनवतात. तर आज आम्ही तुम्हाला श्रावण महिन्यात तुम्ही शाबुदाणा खीर आणि रताळ्याचा शिरा कसा बववावा हे सांगणार आहोत. त्यासाठी खाली दिलेली रेसिपी फॉलो करा. 

साबुदाणा खीर बनवण्यासाठी साहित्य

1 वाटी साबुदाणा1 लिटर दूध1 वाटी साखर1 चमचा तूप

कशी बनवावी साबुदाणा खीर

खीर करण्यासाठी साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुऊन घेऊन थोडेसे पाणी ठेऊन 2-3 तास भिजत घालावा. सुकामेव्याचे तुकडे करुन घ्यावे.

आता गॅस सुरु करुन कढई ठेवावी. तूप टाकावे. सुकामेवा टाकावा. सुकामेवा किंचित सोनेरी झाला की भिजलेला साबुदाणा त्यात टाकावा. साबुदाणा त्यात एक ते दीड मिनिटे परतून घ्यावा.

आता त्यात पाणी टाकून 2-3 मिनीटे शिजवून घ्यावे. शिजल्यावर त्यात साखर घालावी. चांगले उकळल्यावर त्यात दुध टाकावे.

दुधासह खीर उकळल्यावर त्यात विलायची पुड टाकुन एक उकळी येऊ देवून गॅस बंद करावा. खीरीवर सुकामेवा टाकून आणि आवडत असेल तर तूप टाकून सर्व्ह करावे.

रताळा शिरा बनवण्यासाठीची सामग्री

2 मोठी रताळी1/2 कप साखर1 टीस्पून वेलची पावडर1 टेबलस्पून तूप

रताळ्याचा शिरा बनवायची कृती

सर्वप्रथम रताळी स्वच्छ धुवून घ्या मग पातेल्यात थोडे पाणी घालून उकळवून घ्या.

उकळून झाले की,साल काढून घ्या आणि चाकूने गोल गोल चकत्या करा. त्या चकत्या कढई मध्ये तूप घालून परतून घ्या.

परतून झाले की,त्यात साखर आणि वेलची पावडर घाला. मिक्स करून छान शिजू दया.

अगदी छान मऊ शिरा तयार होतो आणि मस्त लागतो.

 

इतर महत्वाच्या बातम्या