Shravan Somvar 2023 : शिवभक्तांसाठी (lord Shiva) श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा विशेष मानला जातो. या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि पूजा करतात. असे मानले जाते की, श्रावण सोमवार व्रत आणि पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. अशात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी भाविकांकडे एकच सोमवार उरला आहे. त्यामुळे या दिवशी विशेष पूजा करावी.

श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी महादेवाची अशी पूजा कराश्रावणाच्या शेवटच्या सोमवारी सकाळी स्नान करून भगवान शंकराची उपासना करण्याचा संकल्प घ्यावा. सकाळी, एखाद्या शुभ मुहूर्तावर, शिव मंदिरात जा किंवा घरी शिवलिंगाची पूजा करा. त्यानंतर भगवान शंकराच्या पिंडीवर गंगाजल किंवा दुधाचा अभिषेक करावा. यानंतर भगवान शिवशंभूला चंदन, अक्षता, पांढरी फुले, बेलपत्र, भांगाची पाने, शमीची पाने, धोतरा, भस्म आणि फुलांची माळ अर्पण करा. भगवान शंकराला मध, फळे, मिठाई, साखर, धूप आणि दिवे अर्पण करा. नंतर शिव चालिसा आणि सोमवार व्रत कथा पाठ करा. शेवटी शिवलिंगासमोर तुपाचा दिवा लावून शंकराची आरती करावी.

 

या श्रावणाला खास महत्वयावर्षी अधिक मास असल्याने अधिक श्रावण आणि निज श्रावण मिळून 59 दिवसाचा श्रावण महिना झाला. त्यामुळे या श्रावणाला खास महत्व प्राप्त झाले आहे, 18 जुलै पासून सुरू झालेला श्रावण महिना 15 सप्टेंबर रोजी संपणार आहे. निज श्रावणातला आणि संपूर्ण श्रावण महिन्यातला चौथा आणि शेवटचा श्रावण सोमवार 11 सप्टेंबर रोजी आला आहे.

श्रावण सोमवार शुभ योगश्रावण सोमवारच्या चौथ्या आणि शेवटच्या सोमवारी पुष्य नक्षत्र 7 वाजून 59 मिनिटापर्यंत राहील. यादिवशी परिघ योग तयार होत असून, हा योग रात्री 12 वाजून 12 मिनिटांपर्यंत राहील. या योगात शत्रूंवर विजय मिळवता येतो असे सांगितले जाते. तसेच कौलव करण 10 वाजून 38 मिनिटापर्यंत राहील.

शेवटच्या श्रावणी सोमवारची शिवामूठज्योतिषांच्या मते, विवाह झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे स्त्रिया शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात.श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यावर शिवामूठ वाहावी. चौथ्या श्रावणी सोमवारी जव शिवामूठ म्हणून वाहण्याची पद्धत आहे. ॐ नमः शिवाय। असा मंत्र शिवामूठ वाहताना म्हणावा. ज्यांना शिवमंदिरात जाणं शक्य नसेल, त्यांनी घरीच शिवामूठ वाहावी. 

महामृत्युंजय मंत्र

ऊँ हौं जूं स: ऊँ भुर्भव: स्व: ऊँ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।ऊर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय मामृतात् ऊँ भुव: भू: स्व: ऊँ स: जूं हौं ऊँ।।भगवान शिव के प्रिय मंत्रॐ नमः शिवाय।नमो नीलकण्ठाय।ॐ पार्वतीपतये नमः।ॐ ह्रीं ह्रौं नमः शिवाय।ॐ नमो भगवते दक्षिणामूर्त्तये मह्यं मेधा प्रयच्छ स्वाहा।

श्रावण सोमवार पुजा विधी

सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घाला.त्यानंतर घरातील मंदिरात दिवा लावावा.सर्व देवी-देवतांना गंगाजलाने अभिषेक करा.त्यानंतर शिवलिंग आणि भगवान शंकराला गंगाजल आणि दूध अर्पण करा.भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा.भगवान शंकराला बेलपत्र, दही, मध, तुळस अर्पण करा.आता भोलेनाथांना पाच प्रकारची फळे अर्पण करून भोग म्हणून अर्पण करा.त्यानंतर भगवान शंकराची आरती करावी.दिवसभर फक्त सात्विक गोष्टी खा.या दिवशी भगवान शिवाच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा.

 

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.