Ram Mandir Ayodhya : देशभरात आज राम नवमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. अयोध्येत आज रामाला सूर्य तिलक लावण्यात आलाय. अयोध्येतील भव्य राम मंदिरांचं 22 जानेवारी 2024 रोजी उद्घाटन करण्यात आलं होतं. या ऐतिहासिक क्षणावेळी मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. अलीकडेच मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनानंतर पंडित मोहित पांडे यांची मंदिराचे नवीन मुख्य पुजारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता ते रामलल्लाच्या दैनंदिन पूजा आणि धार्मिक विधींची जबाबदारी सांभाळत आहेत. अशा स्थितीत त्याला किती पगार मिळतो ते जाणून घेऊया.
मुख्य पुजाऱ्यांसह इतर पुजाऱ्यांना किती पगार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम मंदिराचे मुख्य पुजारी पंडित मोहित पांडे यांना 32 हजार 900 रुपये पगार दिला जातो. तर सहाय्यक पुजारींना 31 हजार रुपये पगार मिळतो. पूर्वी हे वेतन 25 हजार रुपये होते. तर सहाय्यक पुजाऱ्यांचे वेतन 20 हजार रुपये होते.
इतर कोणत्या सुविधा मिळतात?
वृत्तानुसार, पगाराव्यतिरिक्त पंडित मोहित पांडे यांना ट्रस्टकडून इतर धार्मिक कार्ये, निवास, प्रवास सुविधा आणि विशेष धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी व्यवस्थेशी संबंधित आवश्यक सुविधा देखील दिल्या जातात.
अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी मोहित पांडे यांनी पुजारी पदासाठी आवश्यक वैदिक प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले होते. त्यांनी सामवेदातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्यंकटेश्वर वैदिक विद्यापीठातून आचार्य पदवी प्राप्त केली. मोहित पांडे यांनी अनेक वर्षांपासून दूधेश्वर वेद विद्यापीठात धर्म आणि अनुष्ठानाचा सखोल अभ्यास केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या