Donald Trump Tariff On India: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आयात शुल्क लागू करण्याची मोठी घोषणा केली. भारतावर 26 टक्के आयात शुल्क (Trump announces 26% tariffs on India) लादण्यात येणार आहे. अमेरिकेच्या या दणक्याचा फटका जगभरातील देशांना बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेने आयात शुल्क लादण्याचा परिणाम आशियाई शेअर बाजारांवर झाला आहे. अमेरिकी आणि आशियाई शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याचे दिसून येत आहे. 

अमेरिका आणि भारत यांच्यात चांगले संबंध आहेत. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चांगली मैत्री देखील आहे. मात्र त्यानंतरही अमेरिकेने भारतावर 26 टक्के आयात शु्ल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माझे सर्वांत चांगले मित्र असूनही भारत अमेरिकेशी योग्य वागत नाही. भारत अमेरिकन उत्पादनांवर 52 टक्के कर लादत असल्याने अमेरिकाही त्या बदल्यात 26 टक्के कर लादणार, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

कोणत्या देशांवर किती आयात शुल्क?

१. चीन: 34 टक्के

२. युरोपियन युनियन: 20 टक्के

३. दक्षिण कोरिया: 25 टक्के

४. भारत: 26 टक्के

५. व्हिएतनाम: 46 टक्के

६. तैवान: 32 टक्के

७. जपान: 24 टक्के

८. थायलंड: 36 टक्के

९. स्वित्झर्लंड: 31 टक्के

१०. इंडोनेशिया: 32 टक्के

११. मलेशिया: 24 टक्के

१२. कंबोडिया: 49 टक्के

१३. युनायटेड किंग्डम: 10 टक्के

१४. दक्षिण आफ्रिका: 30 टक्के

१५. ब्राझील: 10 टक्के

१६. बांगलादेश: 37 टक्के

१७. सिंगापूर: 10 टक्के

१८. इस्रायल: 17 टक्के

१९. फिलीपिन्स: 17 टक्के

२०. चिली: 10 टक्के

२१. ऑस्ट्रेलिया: 10 टक्के

२२. पाकिस्तान: 29 टक्के

२३. तुर्की: 10 टक्के

२४. श्रीलंका: 44 टक्के

२५. कोलंबिया: 10 टक्के एआरडी

अमेरिकेत काय काय महागणार?

1. कार

- अमेरिका वर्षाला 80 लाख कार आयात करते- आयात घटल्यानं देशांतर्गत गाड्या महागणार- कारच नव्हे तर कारचे पार्ट्सही महागणार

2.बियर,व्हिस्की,टकिला 

- मेक्सिकोतून येणाऱ्या मोडेलो,कोरोना बियर महागणार- युरोपातून येणार्‍या मद्यांवर 200 टक्के शुल्क लावण्याचा इशारा- पुरवठा घटल्यानं अमेरिकेत मद्य महागणार

3. घरे 

- गृहनिर्माणाचं 1/3 साहित्य कॅनडातून जाते- घरांसाठीचं विटा आणि लाकूड महागणार- अन्य देशातून होणारी आयातही महागणार

4. मॅपल सिरप 

- जगातले 75 टक्के मॅपल सिरप कॅनडात बनतं- आयात घटल्यास देशांतर्गत उत्पादन कमी पडेल- अमेरिकेत 300 मिलीयन डॉलर्सचे मॅपल सिरप होते आयात

5. इंधन 

-अमेरिकेत 60 टक्के इंधन कॅनडातून आयात- कॅनडाच्या मालावर 28 टक्के आयातशुल्क- रिफायनरीजना कच्चे तेल कमी पडणार  6. ऍवोकॅडोज

- 90 टक्के ऍवोकॅडोज मेक्सिकोतून आयात- अमेरिकेत 33 टक्के कृषी माल मेक्सिकोतून- सध्या चार ऍवोकॅडो 7 डॉलर्सला

संबंधित बातमी:

Donald Trump Tariff On India: अमेरिकेचा टॅरिफ हल्ला; भारतावर 26 टक्के कराची घोषणा, ट्रम्प म्हणाले, नरेंद्र मोदी चांगले मित्र, पण...