Pitru Paksha 2023 : अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंधरा दिवसांना श्राद्ध पक्ष (Shraddha Paksha) म्हणतात. हे दिवस पूर्वजांच्या स्मरणाचे दिवस मानले जातात. श्राद्ध म्हणजे 'श्राद्धय यत् क्रियाते तत्'. भक्तिभावाने केलेल्या तर्पणाला श्राद्ध म्हणतात. पितरांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्ध विधी पूर्ण भक्तिभावाने करावेत. 



मृत्यूच्या तिथीला विधीनुसार श्राद्ध करा
आज 29 सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरू झाला आहे. पितृपक्षाचा काळ पितरांचा आदर करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो. पितृ पक्षाच्या काळात पितरांच्या नावाने दान आणि तर्पण केल्याने पितरांकडून आशीर्वाद मिळतात. असे केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते. यावर्षी पितृ पक्ष 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. या दिवसांमध्ये पितरांचा आदर करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. धार्मिक मान्यतेनुसार, श्राद्ध विधी न केल्याने आणि पूर्वजांच्या ऋणातून मुक्त न झाल्याने अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. म्हणूनच श्राद्धपक्षात त्याच्या मृत्यूच्या तिथीला विधीनुसार श्राद्ध केल्याने हे ऋण मुक्त होते. पण जर मृत्यूची तिथी आठवत नसेल तर काय करावे? जाणून घ्या.


 



पितृ पक्ष 2023 : 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर 
29 सप्टेंबर 2023 ते 14 ऑक्टोबर 2023 या कालावधीत श्राद्ध पक्ष असेल. हा काळ भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत असतो. श्राद्धाच्या वेळी पितरांना प्रामुख्याने खीर आवडते, त्यामुळे श्राद्धाच्या दिवशी खीर-पुरी नैवेद्य म्हणून ठेवल्यास उत्तम ठरेल. या विशेष काळात विवाह, साखरपुडा, गृहस्थापना, घटस्थापना यासारखी शुभ कार्ये केली जात नाहीत.



मृत्यूची तारीख आठवत नसेल तर श्राद्ध कधी करावे?


-लक्षात ठेवा की सर्व पितरांचे त्यांच्या मृत्यूच्या तिथीच्या दिवशी श्राद्ध केले जाते.


-परंतु सर्व मृत महिलांचे श्राद्ध नवमीला करावे. या वर्षी शनिवार 7 ऑक्टोबर 2023 रोजी ज्याला "मातृनवमी" म्हणतात.


-ज्या पुरुषांची पुण्यतिथी माहित नसेल, त्यांचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला करावे. जे शनिवार 14 ऑक्टोबर 2023 रोजी आहे.


-आजोबांचे श्राद्ध अश्विन शुक्ल पक्षातील प्रतिप्रदा तिथीला केले जाते, ज्याला "नाना श्राद्ध" आणि "आजा" असेही म्हणतात. 


-जेव्हा लग्न झालेल्या मुलीचे वडील हयात नसतात, तेव्हा नातू आपल्या आजोबांचे श्राद्ध करतो 


-वडिल कोणत्याही तिथीला मरण पावले हे महत्त्वाचे नाही, परंतु मुलगी तिच्या घरी वडिलांचे श्राद्ध फक्त अश्विन शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीलाच करते, जी यावेळी 15 ऑक्टोबर 2023 आहे.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या 


Pitru Paksha 2023 : पितृपक्षात दाढी, मिशा, नखं आणि केस कापावेत की नाही? शास्त्रानुसार काय आहेत नियम? जाणून घ्या