Parivartini Ekadashi 2023 : हिंदू धर्मात एकादशी व्रताला खूप महत्त्व आहे. भगवान हरी विष्णूसाठी (Lord Vishnu) एकादशीचे व्रत ठेवले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, जर तुम्हाला तुमच्या जीवनातील संकटे दूर ठेवायची असतील तर एकादशीचे व्रत अवश्य करा. एकादशीच्या व्रताचे पालन केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि भगवान विष्णू तुम्हाला सुख आणि सौभाग्य प्रदान करतात. वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात, एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात. आज परिवर्तिनी एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे.



भगवान विष्णू निद्रावस्थेत कूस बदलतात
परिवर्तनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेत कूस बदलतात. परिवर्तनी एकादशीच्या दिवशी भगवान गणेश आणि श्री हरी विष्णू या दोघांची एकत्र पूजा करता येते. असे मानले जाते की, या दिवशी व्रत केल्यास सोन्याचे दान केल्यासारखे पुण्य मिळते, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तिनी एकादशीचे व्रत केले जाते. काही लोक हे व्रत आज म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी करत आहेत, तर काही लोक उद्या म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी उपवास करतील. जे आज हे व्रत पाळत आहेत ते 26 सप्टेंबरला हे व्रत मोडतील.


 


एकादशीचा उपवास सोडण्याची वेळ


मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 रोजी उपवास सोडण्याची वेळ दुपारी 1:25 ते 3:49 पर्यंत असेल. जे 26 सप्टेंबर रोजी एकादशीचे व्रत पाळतील त्यांच्यासाठी पारायणचा दिवस 27 सप्टेंबर 2023 असेल आणि वेळ सकाळी 6:12 ते 8:36 दरम्यान असेल.



भगवान विष्णूंच्या वामन अवताराची पूजा 
देवशयनी एकादशीच्या दिवशी श्री हरी विष्णू निद्रा घेतात. परिवर्तनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आपली कूस बदलतात, म्हणूनच या एकादशीला परिवर्तनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंच्या वामन अवताराची पूजा केली जाते.



जलझुलणी एकादशी
या एकादशीबद्दल असेही सांगितले जाते की, या दिवशी यशोदेने भगवान श्री विष्णूची वस्त्रे धुतली होती, म्हणून या एकादशीला जलझुलणी एकादशी असेही म्हणतात. अनेक ठिकाणी या दिवशी श्री विष्णूची पालखीतून मिरवणूक काढली जाते. परिवर्तनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूचे व्रत करून त्यांची यथासांग पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच या दिवशी सात वेगवेगळ्या धान्यांनी भरलेली मातीची भांडी ठेवण्याची आणि दुसऱ्या दिवशी तीच भांडी धान्यासह दान करण्याची परंपरा आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या 


Astrology : मंगळाचा कन्या राशीत अस्त, या 5 राशींच्या समस्या वाढणार, शुभ-अशुभ परिणाम जाणून घ्या