Makar Sankranti 2024 : मकर किंवा तीळ संक्रांतीचा सण, सूर्य देवाचा उत्तरायण सण हा 12 जानेवारी 2024 रोजी साजरा केला जाईल. तीळ संक्रांतीची परंपरा कोठून सुरू झाली हे तुम्हाला माहिती आहे का? सविस्तर जाणून घेऊया


'इथून' संक्रांतीला सुरुवात झाली


जबलपूरचे सुप्रसिद्ध इतिहासकार डॉ. आनंद राणा यांचा दावा आहे की, उत्तरायणाच्या दिवशी शनिदेवाने जबलपूरमध्ये नर्मदेच्या तीरावर आपले वडील सूर्यदेव यांना प्रथम तीळ अर्पण केले, तेव्हापासून तीळ संक्रांतीचा उत्सव सुरू झाला. यानंतर जबलपूरच्या या घाटाला तिलवाडा घाट असे नाव पडले. येथे दरवर्षी मकर संक्रांतीची जत्रा भरते.


तिळवाडा घाटाचा संबंध मकरसंक्रातीशी


इतिहास संकलन समिती, महाकौशल प्रांताचे उपाध्यक्ष आणि जबलपूरच्या श्री जानकीरामन महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. आनंद राणा म्हणतात की, ऐतिहासिक आणि पौराणिक पुरावे असं सांगतात की मकर संक्रांतीचा सण सर्वप्रथम मध्यप्रदेशातील जबलपूर या शहरातून सुरू झाला. यानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी माता नर्मदेच्या तीरावर वसलेल्या प्राचीन नगरी जबलपूर येथील तिलवाडा घाटावर शनिदेवाने पिता सूर्याची पूजा करून काळे तीळ अर्पण केले. त्यामुळे येथे तीळ संक्रांतीचा सण साजरा होऊ लागला.


मकर संक्रांतीला तिळाचे महत्त्व


डॉ. राणा म्हणाले की, मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे दान आणि सेवन केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांचे अशुभ प्रभाव कमी होतात, तसेच सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते.


मकर संक्रांत का साजरी केली जाते?


इतिहासकार डॉ.राणा सांगतात की पौराणिक संदर्भात एक कथा आहे, त्यानुसार सूर्य देवाला छाया देवी आणि संज्ञा देवी या दोन बायका होत्या. शनिदेव हा छायाचा मुलगा होता, तर यमराज हा संज्ञाचा मुलगा होता. सूर्य देवांनी छायाला यमराज याच्याशी भेदभाव करत असल्याचे पाहून त्यांना राग आला आणि त्यांनी छाया देवी आणि शनीला स्वतःपासून वेगळे केले. त्यामुळे छाया आणि शनि रागावले आणि त्यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला.


काळ्या तीळांनी सूर्याची पूजा का केली जाते?


पौराणिक माहितीनुसार, या दिवशी यमराजाने कठोर तपश्चर्या करून सूर्यदेवाला कुष्ठरोगापासून मुक्त केले, परंतु सूर्यदेवांनी क्रोधित होऊन शनिदेवाच्या घरातील कुंभ भस्मसात केला. यामुळे छाया आणि शनिदेव यांना त्रास सहन करावा लागला. यमराजांनी त्यांचे वडील सूर्यदेव यांना छाया आणि शनिदेव यांना शापातून मुक्त करण्याची विनंती केली. सूर्यदेवाने होकार दिला आणि ते शनिदेवाच्या घरी गेले पण तिथले सर्व काही जळून गेले होते. शनिदेवाकडे फक्त काळे तीळ उरले होते म्हणून त्यांनी काळ्या तिळाने सूर्यदेवाची पूजा करून त्यांना प्रसन्न केले. सूर्यदेवाने शनिदेवाला आशीर्वाद दिला की जो कोणी मकरसंक्रांतीच्या दिवशी काळ्या तिळाने सूर्याची पूजा करेल त्याचे सर्व संकट दूर होतील. शनिदेवाने वचन दिले की, जो मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करेल त्याला कधीही त्रास होणार नाही. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ देण्याचे विशेष महत्त्व आहे.


तिळवाडा घाटावरील नर्मदा पूजेचे महत्त्व


डॉ. राणा सांगतात की तिळवाडा घाटात या प्रथेची सुरुवात प्राचीन काळापासून झाली होती, परंतु कलचुरी काळात (इ.स. 915 ते इ.स. 945) जेव्हा युवराज देव पहिला खूप शक्तिशाली राजा बनला, तेव्हा त्याचा विवाह दक्षिणेतील राजा अवनी वर्माची कन्या नोहला देवीशी झाला. जी भगवान शिवाची उपासक होती आणि नर्मदा ही शिवाची कन्या आहे. नोहला देवीने या ठिकाणाला जत्रेचे स्वरूप दिले. असं म्हणतात की, नर्मदेच्या तीरावर सूर्याला तीळ अर्पण केल्याने देवी नर्मदेचे वाहन मकराचा त्रास दूर होतो. नर्मदा माता प्रसन्न होऊन भक्तांना सुख-समृद्धी देते. या श्रद्धेमुळे मकर संक्रांतीला तिळवाडा घाटावर मोठ्या संख्येने लोक पोहोचतात. डॉ. राणा यांच्या म्हणण्यानुसार, नोहला देवी यांनी तिळवाडा घाटाचा जीर्णोद्धार केला, जिथे मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा औपचारिकपणे सुरू झाली.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला बनतोय एक अद्भुत योगायोग! 'या' राशीचे लोक होतील मालामाल, ज्योतिषशास्त्रात म्हटंलय...