Janmashtami 2023 Wishes, Quotes and Messages : भगवान श्रीकृष्णजन्माष्टमी ( Janmashtami 2023) यंदा बुधवार, 6 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. तर, काही जण गुरुवार, 7 सप्टेंबर रोजी देखील जन्माष्टमी साजरी करतील, कारण पंचागानुसार यंदा अष्टमी तिथी दोन दिवसांसाठी आली आहे. जन्माष्टमीची घरोघरी आणि मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे. पुराणानुसार, भगवान श्रीकृष्णाचा जन्म द्वापार युगात झाला. भगवान श्रीकृष्णांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात झाला. दरवर्षी जन्माष्टमीच्या सणाबाबत लोकांच्या मनात उत्सुकता असते. कृष्ण जन्माष्टमी आली की, आपल्या नातेवाईकांना तसेच मित्रांना मेसेज मधून शुभेच्छा देण्याची एक मजाच वेगळी असते. तुम्हालाही अशाच शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही त्यांना सोशल मीडीयावर (Social Media) व्हायरल झालेले कृष्ण जन्माष्टमीचे मेसेज पाठवू शकता. जन्माष्टमीच्या खालील शुभेच्छा तुम्हाला शेअर करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडतील. (Happy Janmashtami 2023 Wishes Messages)
कृष्ण ज्याचं नाव, गोकुळ ज्याचं गाव
अशा भगवान श्रीकृष्णाला प्रणाम,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
गोकुळात होता ज्याचा वास, गोपिकांसोबत ज्याने रसला रास,
यशोदा, देवकी होत्या ज्याच्या माता, तोच साऱ्या जगाचा लाडका कृष्ण कन्हैया,
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
दह्यात साखर, साखरेत भात
दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावून उंच थर,
जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,
दहीहंडीच्या शुभेच्छा!
त्याच्या प्रेमात न्हाऊन निघाली राधा
गोड बासरीच्या नादाने बहरली राधा
अशा सावळ्या सुंदर हरीवर जडले प्रेम कायमचे आता ,जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा .
दही हंडी, गोकुळाष्टमी, जन्माष्टमी
नाव अनेक पण उत्साह तोच
जन्माष्टमीच्या मनःपू्र्व शुभेच्छा
जसा आनंद नंदच्या घरी आला
तसा तुमच्या आमच्याही येवो
प्रत्येक घरी कृष्ण जन्म होवो
जन्माष्टमीचा हार्दिक शुभेच्छा
पुत्रातील पुत्र श्रीकृष्ण बासरीवाला
ज्याच्या लीलांना सगळ्यांना भुरळ
तो परम प्रिय नंदलाला शुभ जन्माष्टमी
राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद
लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास
असा आहे आजचा दिवस खास
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा
तो येतो दंगा करतो
हातात घेऊन बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा आहे नटखट नंद किशोर
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा
चंदनाचा सुगंध, फुलांचा हार,
पावसाचा सुगंधआणि
आली राधा-कृष्ण याच्या
प्रेमाची बहर
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
तुझ्या घरात नाही पाणी,
घागर उताणी रे गोपाळा,
गोविंदा तान्ह्या बाळा,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
दही-दूध-लोणी आहे ज्याचा छंद,
तो आमचा लाडका श्रीकृष्ण ,
सगळ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा!
राधेची भक्ती, बासरीची गोडी,
लोण्याचा स्वाद, सोबत गोपिकांचा रास
मिळून साजरा करुया श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दिवस
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
कृष्णाच्या भक्तीत होऊन जाऊ दे दंग
अति उत्साहात अजिबात करु नका नियमभंग,
दहीहंडीच्या शुभेच्छा!
कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं गाव
अशा कन्हैयाला
आम्हा सगळ्यांचं नमन
विसरुनी सारे मतभेद
लोभ- अहंकार सोडा रे
सर्वधर्मसमभाव जागवून
आपुलकीची दहीहंडी फोडा रे,
दहीहंडीच्या शुभेच्छा!
आमच्या हृदयात आहे तुझं स्थान
हे नंदलाला लवकर ये आणि दहीहंडी फोड
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
आला रे आला गोविंदा आला,
गवळ्यांच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा, दहीहंडीच्या शुभेच्छा!