Janmashtami 2023 Upay : तसं पाहायला गेलं तर, भगवान श्रीकृष्णाच्या (Shri Krishna Janmashtami 2023) बालस्वरूपाची प्रत्येक घरात पूजा केली जाते. परंतु भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी ही विशेष मानली जाते, कारण या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला. यामुळेच जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण व्रत-वैकल्ये, उपवास, पूजा अर्चना करतात, तसेच श्रीकृष्णाचे आशीर्वाद घेण्यासाठी मनोभावे पूजा करतात. याशिवाय अनेक भाविकांकडून त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी काही विशेष उपायही या दिवशी केले जातात. तुम्हालाही काही विशेष इच्छा पूर्ण करायची असेल तर जन्माष्टमीच्या दिवशी काही उपाय (Krishna Janmashtami 2023 Upay) अवश्य करा. जाणून घेऊया त्या उपायांबद्दल...



जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल...
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर त्याची पूजा करून उपवास सोडला जातो. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बालगोपाळांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात. ज्योतिष शास्त्रानुसार जर तुम्ही आर्थिक समस्यांनी घेरलेले असाल. खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल तर जन्माष्टमीला कान्हाचा केशरमिश्रित दुधाचा अभिषेक करा. हा उपाय केल्याने भगवान श्रीकृष्णासोबतच तुम्हाला धनाची देवी लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते.



 प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी
कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाच्या पूजेमध्ये चांदीची बासरी अर्पण करा. असे मानले जाते की असे केल्याने प्रत्येक कामात यश मिळते. यासोबतच घरातील सदस्यांमध्ये कलहाची परिस्थिती निर्माण झाली तर तीही संपते.



शत्रूला टाळण्यासाठी 
जर कोणी शत्रू तुमच्या त्रासाचे प्रमुख कारण बनत असेल, तर जन्माष्टमीच्या दिवशी त्याला टाळण्यासाठी "ॐ क्लीं कृष्णाय वासुदेवाय हरी:परमात्मने प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:" चा जप करा. ज्योतिष शास्त्रानुसार यामुळे शत्रूची भीती कमी होते.



जन्माष्टमीच्या पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी
भगवान श्रीकृष्णांना पितांबरधारी असेही म्हणतात. अशा स्थितीत कृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचे पूर्ण फळ मिळण्यासाठी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पिवळी फळे, पिवळी फुले, पिवळी मिठाई लाडू गोपाळांना अर्पण करावी.



विवाह करणाऱ्या इच्छुकांसाठी
लवकर विवाह करणाऱ्या इच्छुकांसाठी कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी "ॐ क्लीं कृष्णाय वासुदेवाय हरी:परमात्मने प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजनवल्ल्भाय स्वाहा’या मंत्राचा जप करा. असे मानले जाते की या मंत्राचा जप केल्याने विवाहयोग्य स्थळ येणं लवकर सुरू होतात.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)