Janmashtami 2023 : श्रीकृष्ण (Shri Krishna) हा भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे. ज्या दिवशी श्रीकृष्णाचा (Janmashtami 2023) जन्म झाला तो दिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची पूजा केली जाते. हा सण कृष्ण भक्त मोठ्या थाटामाटात साजरा करतात. या दिवशी लोक उपवास करतात आणि मंदिरात पूर्ण भक्तीभावाने पूजा करतात. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला होता, म्हणून या दिवशी रात्री जागरण देखील केले जाते. जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे बालस्वरूप असलेल्या बालगोपाळाची पूजा केली जाते. या दिवशी त्यांना पूर्ण भक्तीभावाने सजवले जाते. जाणून घ्या श्रीकृष्णाच्या श्रृंगारासाठी कोणत्या गोष्टींचा समावेश करावा? जाणून घेऊयात

जन्माष्टमीला असं सजवा तुमच्या श्रीकृष्णाला!

  • भाविक भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे ठेवतात. 
  • कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी प्रथम त्यांना स्नान घालतात.
  • त्यानंतर पिवळे, हिरवे, लाल, मोरपंखीचे कपडे किंवा फुले असलेले कपडे घालतात. 
  • विविध रंगीबेरंगी वस्त्रे तुम्ही श्रीकृष्णाला घालू शकता. 
  • यानंतर, त्यांना सिंहासनावर बसवा. 
  • बासरी कान्हाला फार प्रिय आहे. बासरीशिवाय बाळकृष्णाचा श्रृंगार अपूर्ण आहे.
  •  कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या हातात छोटी बासरी ठेवावी. यातून त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो, असे म्हणतात.
  • श्रीकृष्णाला मोरपंख खूप प्रिय आहे. जन्माष्टमीच्या दिवशी त्यांनी मोराचा मुकुट घालतात. 
  • यानंतर त्यांच्या कपाळावर कुंकू किंवा चंदनाचा टिळा लावावा. असे केल्याने कृष्ण प्रसन्न होतो आणि सर्व मनोकामना पूर्ण करतो. अशी लोकांची भावना आहे.
  • जन्माष्टमीच्या दिवशी बालगोपाळांना मोत्यांची माळ किंवा वैजयंती हार घालावा. 
  • या दिवशी कृष्णाला पिवळ्या किंवा लाल फुलांनी बनवलेली माळही घालतात. 
  • पूजेच्या वेळी बाळगोपाळाला चांदीची, सोन्याची किंवा रंगीबेरंगी बांगडी घालतात. 
  • कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला सजवताना शक्य असल्यास सोन्याचे, चांदीचे किंवा मोत्याचे कानातले घालावेत. 
  • श्री कृष्णाचा आशीर्वाद घेण्यासाठी बालगोपाळांना चांदीचे पैंजण घालावे. तसेच कंबरेवर कंबरपट्टा घालावा.

जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त

भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या आठव्या तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला, या दिवशी, भाविक उपवास ठेवतात आणि भगवान श्रीकृष्णाच्या जन्मानंतर रात्री 12 वाजता त्यांची पूजा करतात. ज्योतिषांच्या मते, जन्माष्टमी तिथी बुधवार 6 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 03.37 वाजता सुरू होईल. आणि 7 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 04.14 वाजता संपेल. तर जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त रात्री 12.02 ते 12.48 पर्यंत असेल. या मुहूर्तावर श्रीकृष्णाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशी धारणा आहे की,  पुराणानुसार रोहिणी नक्षत्रात रात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला. या श्रद्धेनुसार भाविक 6 सप्टेंबर रोजी त्यांची जन्मदिवस करतील. या दिवशी रोहिणी नक्षत्राचाही योगायोग तयार होत आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)