Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सव निमित्त ठिकठिकाणी गणेशाचं आगमन वाजत-गाजत होत आहे. बाप्पाचं स्वागत मोठ्या उत्साहात केलं जातंय. यानिमित्त ठिकठिकाणी सत्यनारायण पूजेचं आयोजन केलं जातं. महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये विशेष प्रसंगी सत्यनारायणाची पूजा केली जाते. ही पूजा जोडप्याकडून केली जाते. पूजा संपल्यानंतर अनेक ठिकाणी उखाणे घेण्याचा आग्रह केला जातो. यावेळी अनेकांना काय नाव घ्यायचं ते सूचत नाही. पण चिंता करू नका, आज आम्ही तुम्हाला सत्यनारायण पूजेच्या वेळी काही निवडक उखाणे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या...



लग्न, पूजा समारंभात नाव घेण्याची पद्धत 


लग्नामध्ये तसेच पूजा समारंभामध्ये नाव घेण्याची पद्धत आहे. सत्यनारायण पूजा हि विशेष तिथी किंवा सणाला घरासोबतच सोसायटी तसेच दुकानांमध्ये पण केली जाते. आपल्याकडे लग्न झाल्यावर नवीन वर वधूच्या हातून तर पूजा केली जाते आणि त्यावेळी उखाणा सुद्धा घ्यायला लावतात. यावेळी उखाण्याला मराठी मध्ये नाव घेणे असेही म्हणतात. म्हणूनच 



सत्यनारायणापुढे लावली समईची जोडी
...... रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी



सप्तपदीची सात वचने आणि सात जन्माची साथ
मोठ्याचा सदा राहो आशीर्वादाचा हात
संकटकाळी नेहमी राहीन .
....रावांचे नाव घेते
 सुख समृद्धी मागते सत्यनारायणाकडे



सत्यनारायण देवाची राहो सदा कृपादृष्टी
......... रावांच्या येण्याने सुंदर वाटे सृष्टी


 


सत्यनारायणाला नमस्कार करते जोडीने
....... रावाचं नाव घेते जोडीने



चौरंगावर  कलश कलशावर संध्यापात्र,
त्यात आहे तांदळाची रास
त्या राशीवर विराजला बाळकृष्ण खास
बाळकृष्णाला वाहिले तुळशीचे पान
........ रावांमुळे मिळाला मला सौभाग्याचा मान


 


सत्यनारायणाला मागते सुख, समृद्धी, आरोग्य
......... रावांच्या रूपात मिळाला जीवनसाथी योग्य


 



अंगणात आहे तुळस त्याला पाणी घालू किती
..... रावांच्या हातात सत्यनारायणाची पोथी



 सत्यनारायणापुढे दरवळला धुप अगरबत्तीचा सुवास
.... रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास



सत्यनारायणापुढे लावली पंचरंगी समई
.... राव माझे पती मी त्यांची अखंड सौभाग्यवती



नाकारल्या नाथाला सोन्याचा साज
.... रावांचं नाव घेते सत्यनारायण आहे आज



सत्यनारायणाच्या पूजेला बनवला प्रसादाचा शिरा
..... राव मला मिळाले जसा शोधून सापडला हिरा



 गुरु चरित्राचे करावे पारायण
..... रावांचे नाव घेते आज आहे सत्यनारायण



हिमालय पर्वतावर तपश्चर्या करत होते साधुमुनी आणि ऋषी
.... रावांचं नाव घेते सत्यनारायचं पूजनाच्या दिवशी



... रावांसोबत केली पूजा, पूजेसमोर निरंजन
निरांजनाच्या तूप, तुपात फुलवात
सत्यनारायणाला नमस्कार करून करते, संसाराला सुरवात



कुरुक्षेत्रात कृष्ण झाला अर्जुनाचा सारथी
...... रावांसोबत करते सत्यनारायणाची आरती


 


अंगणी काढली रांगोळी दारी बांधले तोरण
...... रावांचा नाव घेते सत्यनारायण पूजेचं कारण



प्राजक्ताच्या पायथ्याशी शुभ्र फुलांच्या राशी
.... रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी



सरस्वतीच्या मंदिरात साहित्याच्या राशी
..... रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी



सत्यनारायणाची पूजा करते खाली वाकून
..... रावांचा नाव घेते सर्वांचा मन राखून



विशाल सागर भेटण्याकरिता खळखळत जाते सरिता
...... रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेकरिता


 


हेही वाचा>>>


 


Ganeshotsav Travel : 'सृष्टीच्या कणाकणात आहे माझा श्रीगणेश!' केवळ भारतातच नाही तर परदेशातही गणेशाची 'ही' मंदिरं माहित आहेत? मनोकामना होते पूर्ण


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )