Diwali 2023 : दिवाळी हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. दिवाळी हा सण जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवाळीत लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर येते आणि प्रत्येक घराला भेट देते. दिवाळीच्या दिवशी लोक लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. यापैकी झाडूचे उपाय अतिशय उपयुक्त मानले जाते. झाडूशी संबंधित या उपायांबद्दल जाणून घ्या


दिवाळीत करा हे झाडूचे उपाय


वास्तुशास्त्रानुसार, दिवाळीच्या दिवशी झाडूशी संबंधित उपाय अतिशय उपयुक्त मानले जातात. ज्योतिषशास्त्रात झाडूला धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित मानले जाते. 


काही कारणास्तव तुम्हाला धनत्रयोदशीला झाडू खरेदी करता आला नसेल, तर दिवाळीच्या दिवशी नक्कीच खरेदी करा.


दिवाळीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करा आणि त्याच दिवशी जुना झाडू घरातून फेकून द्या. शास्त्रामध्ये दिवाळीच्या दिवशी झाडू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.


जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल तर दिवाळीच्या दिवशी तीन झाडू खरेदी करा आणि घरी आणा. 


आता एक झाडू शांतपणे मंदिरात ठेवा आणि परत या. यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतात.


दिवाळीच्या सकाळी संपूर्ण घर नवीन झाडूने स्वच्छ करावे. ते वापरल्यानंतर, हा झाडू कुठेतरी लपवून ठेवा जेथे लोकांना ते दिसत नाही. 


असे केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते.


झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते. झाडू कधीही जबरदस्तीने फेकून देऊ नये. 


झाडूचा अनादर करणे म्हणजे धनाची देवी लक्ष्मीचा अनादर करणे. असे केल्याने देवी लक्ष्मी रागावून निघून जाते.


झाडू कधीही उभा ठेवू नये, यामुळे वास्तुदोष होतात. झाडू नेहमी जमिनीवर ठेवला पाहिजे. झाडू दरवाजाच्या मागे लपवून ठेवावा.


 


धनत्रयोदशीला लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त



धनत्रयोदशीच्या संध्याकाळी प्रदोष काळात गणेश, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा आहे. या पूजेचा शुभ मुहूर्त 5.47 पासून सुरू होईल आणि 7.47 पर्यंत चालेल. यानुसार धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्ताचा एकूण कालावधी एक तास 56 मिनिटे असेल.


धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ काळ



प्रदोष काल 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:46 ते 8:25 पर्यंत आहे. वृषभ लग्नाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:08 ते 8:05 पर्यंत आहे. दिवे दान करण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:46 ते 8:26 आहे.


 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Diwali 2023 : दिवाळीच्या रात्री पाल दिसली तर समजून जा, देवी लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत? ज्योतिषशास्त्रानुसार 'हे' काम करा,