Clean Puja Utensil: सध्या गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) अवघ्या काही दिवसांवर आला आहे. घरोघरी बाप्पाच्या पूजेसाठी तांब्यापितळ्याची भांडी स्वच्छ करायला अनेकांनी काढली आहेत. बाप्पासमोर स्वच्छ चकाकणारी ताम्हणं, दिवे, समया असाव्यात असं सगळ्यांना वाटतं. पण साफसफाई, डेकोरेशन सुरु असताना तांब्यापितळ्याच्या भांड्यांना आता चांगलंच रगडावं लागणार..त्यात वेळही फार जातो अशी अनेकजण तक्रार करतात. पण आता ही भांडी स्वच्छ करण्यासाठी काही घरगुती गोष्टी वापरून अवघ्या काही मिनिटात ही भांडी चकाचक होणार आहेत. मेणचट, काळपट डाग या उपायांनी पटकन निघून वेळ वाचणार आहे.
चिंचेचा कोळ वापरून करा भांडी स्वच्छ
तांब्यापितळ्याची भांडी एकदा काळपट, मेणचट झाली की त्याला स्वच्छ करायला फार वेळ लागतो. ही भांडी स्वच्छ करण्यासाठी चिंचेचा कोळ वापरता येतो. एका वाटीत चिंच घ्या त्यात. उकळतं पाणी टाकून काही वेळ चिंच भिजवून ठेवा. आता चिंचेचा कोळ पूर्ण काढून या पाण्यात ही भांडी बुडवून ठेवा किंवा या पाण्याने ही भांडी घासून काढा. नंतर साध्या पाण्यानं ५- १० मिनिटांनी धुतल्यानं भांडी साफ होतील.
व्हिनेगर-मीठाच्या पेस्टने होतील भांडी चकचकीत
जेव्हा तांब्याच्या वस्तू पाण्याच्या किंवा फक्त हवेच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्यावर त्वरीत काळे डाग पडतात. यासाठी व्हिनेगर आणि मीठाची एक पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये एक कपडा भिजवा. गोलाकार पद्धतीनं किंवा टूथब्रशने घासून भांडी लख्ख करा. नंतर कोमट पाण्याने धुवून पूसून घ्या.
लिंबू-मीठानेही पूजेची भांडी होतात लख्ख
मूर्ती आणि पूजेची भांडी स्वच्छ करण्यासाठी ही पद्धत वापरून पहा. ही प्रक्रिया वापरण्यासाठी, एका भांड्यात फक्त 3 चमचे मीठ आणि उकळत्या पाण्यात लिंबू पिळून घ्या, नंतर वस्तू 5 मिनिटे बुडवा. ते काढून टाका आणि पूर्ण झाल्यावर मऊ टॉवेलने पूसून घ्या. हे काळे डाग आणि डाग काढून टाकण्यास मदत करेल. आपण लिंबूसाठी व्हिनेगर देखील बदलू शकता.
बाजारातल्या पावडरचाही वापर करू शकता
भांडी लख्ख करण्यासाठी पितांबरी किंवा इतर पावडरचा वापरही करता येतो. यानेही भांडी स्वच्छ होतात. यासाठी भांडं ओलं करून त्यावर हलक्या हाताने पावडर टाकून घासल्यानं पूजेची भांडी चमकण्यास मदत होईल.
चांदीच्या भांड्यांसाठी पांढऱ्या टूथपेस्ट वापरा
टूथपेस्ट ही DIY चांदी साफ करण्याच्या सोप्या पद्धतींपैकी एक आहे. डिशवर फक्त वाटाण्याच्या आकाराची टूथपेस्ट घ्या आणि दागिन्यांवर किंवा चांदीच्या भांड्यावर वर्तुळाकार हालचालींनी घासून ते पॉलिश करा आणि डाग साफ करा. 5 मिनिटे राहू द्या आणि नंतर टूथपेस्ट पाण्याने स्वच्छ धुवा. या प्रक्रियेचे अनुसरण केल्यानंतर, चांदीची वस्तू साफ केली जाते.