Beed News : बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे अधिक मासानिमित्त भगवान पुरुषोत्तमच्या दर्शनासाठी महिनाभर भाविकांची मोठी गर्दी असते. आकाशातून ड्रोनच्या माध्यमातून या मंदिराचे दृश टिपण्यात आले असून, दृश्यामध्ये दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे असलेल्या भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मुख्य मंदिराचे बांधकाम सुरू असल्याने पुरुषोत्तमाची मूर्ती एका शेडमध्ये ठेवण्यात आली असून, दर्शनासाठी लांबच लांब भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. दर तीन वर्षांनी अधिक मास येत असल्याने भारतातील एकमेव असलेले पुरुषोत्तम पुरी येथील भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. यावर्षी शासनाने 54 कोटी रुपयांचा निधी मिळाल्यामुळे हे मंदिर पुरातन असल्याने मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी मंदिर पाडून परिसरातील रिकाम्या जागेत शेड मारून त्या ठिकाणी भगवान पुरुषोत्तमाची मूर्ती ठेवण्यात आली आहे.


मंदिर परिसरामध्ये मंदिराचे बांधकामाचे साहित्य असल्याने जागा अपुरी पडल्याने यावर्षी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची काही प्रमाणामध्ये गैरसोय होत आहे. मात्र, असे असताना मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत. तर दररोज 50 ते 60 हजार भाविक या ठिकाणी पुरुषोत्तमाचे दर्शन घेत आहेत. मंदिर परिसराला वळसा मारून दर्शना रांग तयार करण्यात आले असल्याने भाविकांना चार ते पाच तासांचा कालावधी दर्शनासाठी लागत आहे. तर दुसरीकडे मंदिर प्रशासनाच्या वतीने देखील भाविकांना लवकर दर्शन मिळावे यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. 


मंदिराचे काम सुरु... 


भारतातील एकमेव असलेले पुरुषोत्तमपुरी येथील भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी भावकांची मोठी गर्दी असते. त्यातच अधिक मास असल्याने भाविकांची गर्दी आणखीच वाढली आहे. मात्र, मंदिराचे काम सुरु असल्याने मूर्ती रिकाम्या जागेत शेड मारून त्यात ठेवण्यात आली आहे. त्यामुळे पुरेसी जागा उपलब्ध नसल्याने भाविकांची गर्दी होत आहे. तर मंदिर प्रशासन यासाठी प्रयत्न करून वेळेत भाविकांना दर्शन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. 


पावसासाठी ब्रह्मेश्वर मंदिर भरले पाण्याने


रम्याण परळी शहर व परिसरात पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी रविवारी श्री ब्रह्मेश्वर मंदिर पाण्याने भरवण्यात आले. तसेच शिवलिंगास जलाभिषेक करण्यात आला. यासाठी हरिहर तीर्थातील पाणी आणले होते. हर हर महादेव, प्रभू वैद्यनाथ भगवान की जय, असा जयघोष करीत ब्रह्मेश्वर मंदिरात 110 शिवभक्तांनी पाणी भरून साकडे घातले. तसेच धर्मवीर सामाजिक युवा प्रतिष्ठान संचलित वैद्यनाथ भक्ती मंडळ व पुरोहित महासंघाच्या वतीने दर रविवारी शहरात व परिसरातील मंदिरात स्वच्छता अभियान राबविण्यात येते. या रविवारी पाऊस पडावा म्हणून ब्रह्मेश्वर मंदिराला पाणी घालत साकडे घालत शिवलिंगास जलाभिषेक करण्यात आला.


इतर महत्वाच्या बातम्या: