Relationship Tips : तरुण मुलं मुलींना नेमक्या मुलांमधल्या कोणत्या गोष्टी आवडतात? त्यांना कशी मुलं आवडतात हे जाणून घेण्यात खूप उत्सुक असतात. एक वेळ तुमच्याकडे पैसा नसेल किंवा तुम्ही फार देखणे नसाल तरी चालेल पण जर तुमच्याकडे योग्य संस्कार आणि काही मॅनर्स नसतील तर तुमच्या अनेक गोष्टी पुढे बिघडू शकतात. अर्थात, प्रत्येक मुलीची मुलाला पारखण्याची पद्धत वेगवेगळी असते. पण, काही सवयी अशा आहेत ज्या प्रत्येक मुलीला तिच्या भावी जोडीदारात हव्या असतात. या सवयी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


तंदुरुस्त शरीर असलेली मुलं


तुम्ही ज शरीराने एकदम फीट असाल तर तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर पडते. मग, तो मुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकालाच फीट राहायला आवडतं. ज्याप्रमाणे मुलं मुलींच्या फिटनेसकडे आकर्षित होतात. अगदी तसेच, मुलीही मुलांच्या फिटनेसकडे आकर्षित होतात.  


कामाच्या बाबतीत अत्यंत फोकस असणारी मुलं 


एक गोष्ट लक्षात घ्या आळशी मुलं मुलींना अजिबात आवडत नाहीत. मुलींना नेहमी ध्येयवादी आणि मेहनती मुलं जास्त आकर्षित करतात. ज्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोण वेगळा असेल. मोठी स्वप्नं असतील आणि मेहनत करण्याची पूर्ण तयारी असेल अशी मुलं मुलींना जास्त प्रभावित करतात. अशा मुलांना मुलींची पहिली पसंती असते.


चांगला ड्रेसिंग सेन्स


मुलीही मुलांच्या ड्रेसिंग सेन्सकडे लक्ष देतात. घर असो किंवा ऑफिस किंवा कुठे डेटला जायचं असेल तर अशा वेळी तुमचा ड्रेसिंग सेन्स खूप महत्त्वाचा असतो. मुली याही गोष्टीकडे योग्य लक्ष देतात. 


जे घरातील कामात रस घेतात


जर तुम्हाला बाहेरच्या कामांबरोबरच घरातील कामाची माहिती असेल, घरातील सर्व कामं तुम्हाला येत असतील तर मुली तुमच्यावर प्रभावित झाल्याच म्हणून समजा. मुलांची ही सवय मुलींना फार आकर्षित करते. 


गंभीर स्वभाव


स्वतःचा स्वाभिमान राखणाऱ्या मुलांकडे मुली लगेच प्रभावित होतात. काही मुलं असतात जी वायफळ बोलतात, प्रत्येक गोष्टीत विनोद करतात, थट्टा-मस्करी करतात. मुली अशा मुलांकडे फार कमी आकर्षित होतात. त्यामुळे तुमच्याकडे तो गुण नसलेलाच चांगला आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Facial Yoga benefits : सुंदर आणि तरूण त्वचेचं रहस्य आहे फेशियल योगा; जाणून घ्या करण्याची योग्य पद्धत