Facial Yoga benefits : योगा (Yoga) करण्याचे किती फायदे आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तसेच, फेशियल योगाचे देखील अनेक फायदे आहेत. फेशियल योगा तुमच्या चेहऱ्यावर (Skin) नैसर्गिक ग्लो आणण्यास आणि तुमची त्वचा तरूण ठेवण्यास मदत करतो. फेशियल योगा देखील तुमच्या चेहऱ्याला रोजच्या थकव्यापासून आराम देऊ शकतो. हा योगा करणं फार सोपा आहे. जाणून घेऊया फेशियल योगा करण्याचे फायदे.
फेशियल योगा करण्याचे फायदे
- तुमच्या चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढते.
- वृद्धत्वामुळे होणार्या येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यात मदत करू शकते.
- चेहऱ्यावरील लिम्फ ड्रेनेजमध्ये प्रभावी आहे.
- चेहऱ्याचे स्नायू नीट करण्यास मदत होते.
- तणावमुक्त होतो.
फेशियल योगा कसा कराल?
फेस योगा करण्यापूर्वी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर किंवा फेशियल ऑईल लावा, जेणेकरून तुमची बोटे चेहऱ्यावर सहज फिरण्यास मदत होईल आणि स्ट्रेचिंगमुळे त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही.
फेस टॅपिंग
तुमच्या कपाळावर हळूवारपणे टॅप करायला सुरुवात करा. नंतर हळूहळू तुमचा चेहरा खाली करा आणि तुमचे गाल आणि जबडा देखील टॅप करा. तसेच, आपल्या मानेवर हळूवारपणे टॅप करा. हा व्यायाम तुमच्या चेहऱ्याचे रक्ताभिसरण वाढविण्यास मदत करतो आणि चेहऱ्याच्या स्नायूंना आराम देतो .
फोरहेड लिफ्ट
तुमच्या दोन्ही हातांचे तळवे एकत्र करा आणि ते तुमच्या कपाळावर ठेवा आणि काही सेकंदांसाठी तुमचे कपाळ वरच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या कपाळाची त्वचा घट्ट होते.
चिक लिफ्ट
तुमच्या चेहऱ्याच्या खाली दोन बोटे ठेवा आणि त्यांना हळूहळू वर हलवा. हा व्यायाम गालांच्या स्नायूंसाठी फायदेशीर आहे. हा व्यायाम तुमच्या गालांच्या स्नायूंना टोन आणि घट्ट करण्यास मदत करतो.
जॉ लिफ्ट
तुमच्या हातांच्या मुठी बंद करा आणि त्यांना तुमच्या जबड्याजवळ ठेवा आणि त्यांना वरच्या दिशेने हलवा. हे तुमच्या जबड्याची रेषा टोन करेल.
नेसोलेबियल फोल्ट
तुमचे तोंड उघडा आणि तुमचे ओठ लहान करा आणि तोंडाच्या दोन्ही बाजूला बोटे ठेवा आणि हलके दाबा. आता तुमचे ओठ बाहेरच्या दिशेने हलवण्याचा प्रयत्न करा. यामुळे हसण्याच्या रेषा कमी होतील आणि नाकाजवळच्या रेषाही गुळगुळीत होतील.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Health Tips : सर्दी आणि घसादुखीचा खूप त्रास होतोय? वेळीच वाफ घ्या अनेक आजारांवर आहे रामबाण उपाय