Relationship Tips : आज त्याची पहिली डेट होती... थोडा खूश...थोडा नर्व्हस होता तो...आज तो तिला पहिल्यांदा भेटणार.. मग समोरासमोर बोलणार… पुढे काय होणार...कुणास ठाऊक… ज्यांची पहिली डेट असेल, त्यांच्या मनात असे विविध प्रश्न येतात. एखाद्या अनोळखी व्यक्तीला पहिल्यांदा भेटताना खूप उत्साह तर असतो, पण थोडी अस्वस्थताही असते. या दिवशी कोणते कपडे घालावे? भेटण्यासाठी कोणते ठिकाण निवडावे? या गोष्टींबद्दल मनात खूप गोंधळ असतो, समोरच्या व्यक्तीला भेटल्यावर तिच्याशी काय बोलू? ही सर्वात मोठी चिंता असते. रिलेशनशिप तज्ज्ञांच्या माहितीनुसार जर तुम्ही खूप बोलके असात तरीही गोष्टी बिघडू शकतात, जर तुम्ही शांत स्वभावाचे असाल तर गोष्टीही बिघडू शकतात. अशात करायचं तरी काय? असा सर्वात मोठा प्रश्न पडतो. चिंता करू नका..आज आम्ही अशाच काही विषयांबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही व्यवस्थित संभाषण सुरू करू शकता आणि तुमच्या समोरच्या व्यक्तीवर छाप पाडू शकता. जाणून घ्या...



आधी कौतुक करत संभाषणाला सुरूवात करा


कौतुकाने संभाषण सुरू करा. यामुळे समोरच्या व्यक्तीला आनंद तर होईलच, पण तुमच्या नजरेचे कौतुकही होईल. समोरच्या व्यक्तीचा पोशाख, ॲक्सेसरीज किंवा स्टाइलची प्रशंसा करा आणि संभाषण सहजतेने करा


छंदांबद्दल विचारा


गोष्टी गुंतवून ठेवण्यासाठी त्यांना त्यांच्या छंदांबद्दल विचारा. प्रत्येकाला काही ना काही छंद असतात, ज्याबद्दल त्यांना बोलायला आवडते, म्हणून आधी त्यांच्या छंदाबद्दल जाणून घ्या आणि मग त्यांना तुमच्याबद्दल सांगा.



अनुभव शेअर करा


जीवनातील मजेदार, मनोरंजक अनुभवांबद्दल बोला. तुम्हा दोघांना कंटाळा येणार नाही याची पूर्ण शक्यता आहे. प्रत्येकाकडे असे काही ना काही गुदगुल्या करणारे क्षण असतात आणि जर नसेल तर तुमच्या स्वतःच्या मजेदार गोष्टी सांगून त्यांना हसवा. मुलांची विनोदबुद्धी मुलींना खूप आकर्षित करते.



आवडत्या 'डिश' बद्दल बोला


या विषयावर बोलण्यासाठी फूडी असण्याची गरज नाही. तुम्ही डेटींगसाठी निवडलेल्या ठिकाणाच्या आवडत्या डिशबद्दल बोलू शकता. दुसरं म्हणजे, तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या आवडत्या डिश बद्दल किंवा खाण्याच्या सवयींबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकता, परंतु या दरम्यान हे संभाषण सामान्य असावे हे लक्षात ठेवा. कोणाच्याही खाण्यापिण्याच्या सवयींवर भाष्य करू नका, नाहीतर पुढची डेट होण्याची शक्यता मावळेल.


 


हेही वाचा>>>


Relationship Tips : परफेक्ट जोडीदार होण्यासाठी फक्त 'एवढंच' करा! नातं इतकं बहरेल की प्रत्येकजण तुमचं उदाहरण देईल.


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )