Relationship Tips : नातं टिकवणं हे दोन्ही जोडीदारांच्या हातात असतं. कारण कोणतंही नातं हे प्रेम आणि विश्वासाच्या पायावर उभं असतं. यामध्ये जेव्हा जोडीदारांचा एकमेकांवरील विश्वासाला तडा गेला तर ते नातं तुटण्याच्या मार्गावर असतं. निरोगी आणि आनंदी नात्यासाठी फक्त प्रेम आणि आपुलकीच पुरेसे नाही तर दोन्ही जोडीदार मानसिकदृष्ट्या निरोगी असणे देखील खूप महत्वाचे आहे. ज्याकडे सहसा आपण ना लक्ष देत नाही. मानसिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीची काही लक्षणं असतात, ज्या समजून घेतल्यास संबंध अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता येतात.


 


नात्यात कलहाचे कारण बनतात 'या' गोष्टी


नातेसंबंध तुटण्याच्या मार्गावर असताना, आपल्यापैकी बहुतेकजण एकमेकांच्या कमतरतांकडे बोट दाखवत राहतात. कोणी काय केले, काय बोलले यावर ते भांडतात. शंका, समजूतदारपणा, मॅच्युरिटी नसणे, जीवनशैली अशा अनेक गोष्टी नात्यात कलहाचे कारण बनू शकतात, पण आणखी एक गोष्ट आहे, ज्याकडे आपण लक्ष देत नाही, ती म्हणजे मानसिक आरोग्य. अनेक वेळा जोडीदारासमोर मोकळेपणाने बोलण्यात संकोच होतो आणि हीच सर्वात मोठी चूक ठरते.


जोडीदाराचा अर्थ असा आहे की तुम्ही आयुष्यातील आनंदच नव्हे तर तुमचं दु:खही तुम्ही जोडीदाराशी मोकळेपणाने शेअर करू शकता आणि ही काही चुकीची गोष्ट नाही. मानसिक समस्यांचे ओझे फार काळ एकट्याने पेलणे शक्य नसते, पण जेव्हा तुम्ही ते तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करता तेव्हा तुम्ही बऱ्याच अंशी मानसिकदृष्ट्या मोकळे होतात.


 


मानसिक तणावाने ग्रस्त असलेल्या जोडीदाराची लक्षणं


पूर्वीपेक्षा जास्त राग
छोट्या छोट्या गोष्टींवर भांडणे
तणाव आणि संघर्ष टाळण्यासाठी स्वत:हून अधिक कामाला प्राधान्य देणे
लैंगिक संबंधात रस नसणे
जास्त बोलत नाही
ही सर्व चिन्हे खराब मानसिक आरोग्याकडे निर्देश करतात, म्हणून त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. 
या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी तुमच्या जोडीदारालाही साथ द्या.



अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पार्टनरला मदत करू शकता


जर तुमचा जोडीदार छोट्या-छोट्या गोष्टींवरून रागावला आणि भांडायला लागला तर अशा परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. 
राग शांत झाल्यावर या विषयावर बोला.
जर तणावामुळे सेक्समध्ये रस कमी झाला असेल तर त्याला या विषयावर अधिक त्रास देऊ नका. 
जेव्हा एखादी व्यक्ती मानसिकदृष्ट्या आरामशीर राहते तेव्हाच तो या गोष्टींकडे लक्ष देऊ शकतो. 
रागाला भडकावण्याऐवजी तुमच्या जोडीदाराला काही काळ एकटे सोडा.
हे सर्व उपाय एक प्रकारचे समर्थन आहेत. 
याच्या मदतीने तुम्ही तुमचे बिघडलेले नाते वाचवू शकता.


 


 


हेही वाचा>>>


Relationship Tips : जोडीदाराला नेहमीच महागडं गिफ्ट, शॉपिंगची गरज नसते, एकदा 'या' गोष्टी सुद्धा करून पाहा, प्रेम आणखी वाढेल


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )