Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) एका राशीतून दुसऱ्या राशीत परिवर्तन करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी घेतो. त्यामुळे शनीच्या (Lord Shani) राशीपरिवर्तनाचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो आणि तो दिर्घकाळ राहतो. शनीने 29 जून रोजी आपल्या राशीत म्हणजेच कुंभ राशीत वक्री चाल केली होती. शनी 15 नोव्हेंबरपर्यंत याच राशीत विराजमान असणार आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबरपर्यंत कोणत्या राशींनी (Zodiac Signs) सावध राहण्याची गरज आहे ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीत अतराव्या चरणात शनी वक्री होणार आहे. त्यामुळे शनीची वक्री चाल मेष राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक ठरू शकते. या दरम्यान नोकरीत तुमचे अनेन दिवसांपासून सुरु असलेले वाद संपुष्टात येतील. तसेच, तुमच्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळेल. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. व्यापारात अनेक दिवसांपासून सुरु असलेली संकटं हळुहळु संपतील. तुमचा व्यापार पुन्हा सुरळीत सुरु होईल. आरोग्याला जपा. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीत शनी अष्टम भावात वक्री होणार आहे. त्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. तसेच, अनेक दिवसांपासून थांबलेली तुमची कामे या काळात पूर्ण होतील. तुम्हाला अचानक धनलाभही होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी तुमच्या पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, आरोग्याची काळजी घ्या. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेरचे तेलकट, तिखट पदार्थ खाऊ नका. 


मकर रास (Capricorn Horoscope)


शनीची वक्री चाल मकर राशीच्या लोकांसाठी फार फायदेशीर ठरणार आहे. करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार करिअर निवडता येऊ शकतं. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुमच्या पद प्रतिष्ठेत चांगली वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. या काळात तुम्हाला मित्रांची चांगली साथ लाभेल. मित्रांच्या मदतीने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : आज द्विग्रह योगासह अनेक शुभ योगांची निर्मिती; 'या' 5 राशींवर राहणार शनीची कृपा, प्रत्येक कामात मिळणार दुप्पट लाभ